शाहरुख खानने ‘पठाण’ चित्रपटाद्वारे बऱ्याच वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. त्याचा चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात ८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. दरम्यान ‘पठाण’मुळे चर्चेत आलेल्या शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “मराठी माणसाला …” शिव ठाकरेबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे आरोह वेलणकर ट्रोल, नेटकरी म्हणाले, “त्याची बदनामी…”

ऑनस्क्रिन इंटिमेट सीन, किंसिंग सीन करणं हे बॉलिवूड कलाकारांसाठी काही नवं नाही. पण काही कलाकार ऑनस्क्रिन किसिंग सीन करण्यासाठी नकार देतात. या कलाकारांमध्ये शाहरुखचाही समावेश आहे. शाहरुख किंसिंग सीन करण्यास का नकार देतो? याबाबत त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये अधिक इंटिमेट सीन, किसिंग सीन नसतात. यामागे काही खासगी कारण किंवा सेन्सॉरशीपमुळे असं घडतं का? असा प्रश्न शाहरुखला विचारण्यात आला. तेव्हा शाहरुख म्हणाला, “वय वर्ष ९० असलेल्या प्रेक्षकांपासून ते वयवर्ष ९ असलेल्या मुलांना लक्षात ठेवून आम्ही चित्रपट तयार करतो. त्यामुळे आमच्या चित्रपटांमध्ये योग्य त्या सगळ्या गोष्टी असतात.”

आणखी वाचा – आदिल खानच्या पहिल्या पत्नीचा राखी सावंतला फोन, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी…”

“पण मला ऑनस्क्रिन किस करणं योग्य वाटत नाही. म्हणून मी ते सीन करत नाही. घोडेस्वारी व किसिंग सीन नाही हे माझ्या कॉन्ट्रॅकमध्येच आहे.” शाहरुख ऑनस्क्रिन इंटिमेट सीन करणं टाळतो. शाहरुखला रोमान्स किंग म्हणून संबोधित केलं जातं. मात्र काम करण्याच्या त्याची एक वेगळीच पद्धत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why shahrukh khan not allowed herself for kissing scene in movie old video goes viral on social media see details kmd