बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या त्याच्या चित्रपटांबरोबर व्यक्तीक कारणांनीह नेहमी चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत शाहरुखच्या वादाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. पण आज आम्ही तुम्हाला त्याचा असा एका वादाचा किस्सा सांगणार आहोत जो त्याची सगळ्यात जवळची मैत्रीण फराह खानच्या पती शिरीष कुंदरबरोबर आहे. शाहरुख खान आणि शिरीष कुंदर यांच्यातील वाद हाणामारीवर पोहोचला होता. ज्यामध्ये शाहरुख खाननेही शिरीषला भर पार्टीत थोबाडीत मारली होती. पण, असे काय कारण होते की शाहरुख खानने त्याची मानलेली बहीण फराह खानच्या पतीला कानशीलात लगावली मारली.
हेही वाचा- ‘भोला’साठी अजय देवगणने आकारले ‘इतके’ कोटी; तब्बूच्या मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क
शाहरुखने शिरीष कुंदरचा चित्रपट नाकारला
फराह खानसोबत ‘मैं हूं ना’ आणि ‘ओम शांती ओम’ सारखे सुपरहिट चित्रपट करणाऱ्या शाहरुख खानला फराहचे पती शिरीष कुंदर यांनी एका चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र शाहरुखला शिरीषच्या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नाही आणि त्याने शिरीषला त्यात बदल करण्यास सांगितले. वेळ निघून गेली आणि काही काळानंतर सुपरस्टार अक्षय कुमार फराह खान आणि शिरीष कुंदरच्या ‘तीस मार खान’ चित्रपटात दिसला. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, हा चित्रपट शाहरुख खान ऑफर करण्यात आला होता, जो किंग खानने नाकारला होता.
शाहरुख आणि शिरीषमध्ये वादाची ठिगणी
खरं तर, २०११ मध्ये सुपरस्टार शाहरुख खानचा ‘रा वन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी फराह खानचा पती आणि दिग्दर्शक शिरीष कुंदर यांनी किंग खानच्या चित्रपटाबाबत ट्विटरवर जोरदार निशाणा साधला होता. शिरीषने ‘रा वन’ रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाबद्दल नकारात्मक ट्विट करण्यास सुरुवात केली. शिरीषने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, रा वन चाहत्यांचे मनोरंजन करण्याशिवाय सर्व काही करू शकते, तर दुसरीकडे शिरीषने ‘रा वन’च्या बजेटवर खिल्ली उडवली आणि १५० कोटींच्या फटाक्यांच्या गडबडीबद्दल बोलले. कुठेतरी शाहरुखलाही शिरीषने आपल्या चित्रपटाविरोधात केलेल्या या वक्तव्याची दखल घेतली होती.
हेही वाचा– आता बास! रश्मिका मंदानाने ‘सामी सामी’ गाण्यावर नृत्य करण्यास दिला स्पष्ट नकार, कारण देत म्हणाली…
अन् शाहरुखने शिरीष कुंदरच्या कानशिलात लगावली
यानंतर संजय दत्तच्या अग्निपथ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये शाहरुख खान आणि शिरीष कुंदर समोरासमोर आले होते, जिथे शिरीषने पुन्हा रा वनवर तोंडसुख घेतले. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, याच पार्टीत शाहरुख खानला शिरीषवर राग आला आणि त्याने शिरीषला कानशिलात लगावली.