सैफ अली खानची आई व सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे त्यांच्या कुटुंबियांबरोबरचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. इतकंच नव्हे तर शर्मिला व करीना कपूर खान यांच्यामध्येही अगदी गोड नातं आहे. शर्मिला यांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी सैफ, करीनासह संपूर्ण कुटुंब राजस्थानला पोहोचलं होतं. पण शर्मिला या आपला लेक सैफबरोबर राहत नाहीत. याचबाबत त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड असूनही ‘बिग बॉस १६’मधील या अभिनेत्रीला रॅपरलाच करायचं आहे डेट, म्हणाली, “ती व्यक्ती…”

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
Shahrukh Khan
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानच्या चित्रपटात गाणे बंद का केले? गायक खुलासा करत म्हणाले, “जेव्हा स्वाभिमान…”

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शर्मिला यांनी मुलांच्या लग्नानंतर त्यांच्यापासून लांब राहण्याबाबत सांगितलं. शर्मिला म्हणाल्या, “तुम्हाला सगळ्याच गोष्टी एकत्र करता येत नाही हा विचारच कधी कधी वेदनादायी असतो. एक काळ असाही होता की, मुलं आपल्या आईशिवाय काहीच करू शकत नव्हते. पण आता मुलांजवळ त्यांचा जोडीदार आहे. त्यांची मुलं आहेत.”

“अशावेळी त्यांचं प्रेम हे दुसरीकडे विभागलं जातं. मुलांची आई ही कुठेच जात नाही. पण आईला गृहित धरलं जातं. पण याचा परिणाम तुमच्यावर होता कामा नये. कारण हा एका मानवी नैसर्गिक विचार आहे. कारण मीही तेच केलं. लग्न झाल्यानंतर माझं संपूर्ण लक्ष हे माझ्या कुटुंबियांकडे वळलं. माझ्या पालकांवरुन माझं लक्ष कमी होत गेलं.”

आणखी वाचा – Video : “लोकांना का त्रास देता?” अमृता फडणवीसांनी शेअर केला ‘शिव तांडव स्तोत्रम्’ गातानाचा व्हिडीओ, नेटकऱ्यांना संताप अनावर

सैफ किंवा मुलीपासून दूर राहण्याची शर्मिला यांना कोणतीच खंत नाही. हे त्यांच्या बोलण्यामधून दिसून आलं. मात्र कार्यक्रम असो वा एखादं सेलिब्रेशन शर्मिला त्यांच्या मुलांबरोबर मजा मस्ती करताना दिसतात. तर सैफही आपल्या आईला पुरेसा वेळ देताना दिसतो. शर्मिला यांच्या वाढदिवसाचे तर अनेक फोटो. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Story img Loader