Why Sonakshi Sinha is selling her Bandra apartment : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मुंबईतील राहत्या घरी झहीर इक्बालशी (Zaheer Iqbal) नोंदणी पद्धतीने लग्न केलं. तेच घर आता ती विकत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. सोनाक्षीचं हे पहिलं घर आहे, त्यामुळे ते तिच्यासाठी खूप खास आहे. सोनाक्षीने लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात हे घर विकण्याचा निर्णय का घेतला यामागचे कारण समोर आले आहे.
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुंबईतील तिचं २५ कोटींचं घर विकत आहे. हे सोनाक्षीचं पहिलं घर आहे. सोनाक्षीने वांद्रेमधील याच सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये तिचा बॉयफ्रेंड, अभिनेता आणि रिअल इस्टेट डेव्हलपर झहीर इक्बालशी लग्न केलं होतं. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात ती हे घर विकणार असल्याने त्याची चांगलीच चर्चा होत आहे.
बॉलीवूड अभिनेत्रीने ब्रिटिश अभिनेत्याशी केलं लग्न, पहिल्या रिलेशनशिपमधून आहे पाच वर्षांचा मुलगा
सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की सोनाक्षीने याच इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर नवीन अपार्टमेंट खरेदी केलं आहे, त्यामुळे ती हे घर विकत आहे. पण ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने या घराच्या विक्रीमागील कारण सांगितले आहे. झहीरची कंपनी बांधत असलेल्या एका इमारतीत सोनाक्षी सिन्हाने मोठे घर खरेदी केले आहे. तिने या घरात झहीरसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. ती नव्या घरात पतीसोबत शिफ्ट होणार आहे, त्यामुळे ती वांद्रेमधील घर विकत आहे.
सोनाक्षी आता हे घर विकत असली तरी ते तिच्यासाठी किती खास आहे हे तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. “माझ्या वडिलांमुळे (शत्रुघ्न सिन्हा) मला माझे स्वत:चे घर घ्यायचे होते. हे बँडस्टँडमध्ये एक लहान अपार्टमेंट आहे. पण त्यांच्यासाठी हे घर एका महालाप्रमाणे आहे,” असं ती म्हणाली होती.
प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, कूर्गमध्ये अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
सोनाक्षीने मुंबईतील वांद्र्यातील Bandra Reclamation या भागात हे अपार्टमेंट २०२० मध्ये खरेदी केलं होतं. घर घेताना आपलं स्वप्न पूर्ण झालं असं सोनाक्षी म्हणाली होती. यानंतर सोनाक्षी दुसरं घर घेतलं होतं. ते 4 बीएचके अपार्टमेंट आहे. “जेव्हापासून मी करिअरला सुरुवात केली तेव्हापासून मी एकच स्वप्न पाहिलं होतं. वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत मला माझं हक्काचं, स्वत:चं घर खरेदी करायचं होतं. मला माझ्या कष्टाच्याच पैशांमध्ये हे घर खरेदी करायचं होतं. तसं मला बराच वेळ लागला आहे. पण अखेरकार माझं स्वप्न साकार झालं आहे”, असं सोनाक्षी हे घर घेतल्यावर म्हणाली होती.