सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) व झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) २३ जून २०२४ रोजी लग्नबंधनात अडकले. सोनाक्षी सिन्हाने घरीच नोंदणी पद्धतीने लग्न केलं. सोनाक्षी भरजरी लेहेंगा न निवडता साडी नेसून लग्न केलं. तिने आई पूनम सिन्हाच्या लग्नातील ४४ वर्षे जुनी साडी नेसली होती. तसेच रिसेप्शनसाठीही तिने साडीच निवडली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनाक्षीने लग्नात आईची ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली होती. तिने हिऱ्यांच्या दागिन्यांनी हा लूक पूर्ण केला होता. सोनाक्षीने २३ जूनला सकाळी घरी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये तिचं रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शन सोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली होती. रिसेप्शनमध्येही सोनाक्षी वेस्टर्न कपडे किंवा लेहेंगा न निवडता लाल बनारसी साडी नेसली होती. या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. लग्नात व रिसेप्शनमध्ये साडी का नेसली, याबाबत सोनाक्षीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नावर ‘या’ सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने बनवला चित्रपट, अमिताभ बच्चन यांनी दिला आवाज

सोनाक्षी सिन्हा ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मी साडी यासाठी नेसली की मला कम्फर्टेबल राहायचं होतं आणि मला माझ्या लग्नात सर्वात जास्त नाचायचं होतं जे मी केलं. झहीर आणि मला असंच काहीतरी करायचं होतं ते आम्ही ठरवलं होतं. खरं मला बाकीचं काहीच माहीत नाही, पण आम्ही एकमेकांबरोबर होतो हे महत्त्वाचं होतं. आणि आम्हाला खूप दिवसांपासून लग्न करायचं होतं, त्यामुळे लग्न कसं करायचं हे आम्ही आधीच ठरवलं होतं.”

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

प्रसिद्ध अभिनेत्याने वडिलांबरोबरचा ‘तो’ सीन पाहून शर्मिला टागोर यांना मारली होती झापड; म्हणाला, “आजही जेव्हा मी…”

अत्यंत खासगी व सुंदर लग्न – सोनाक्षी सिन्हा

ती पुढे म्हणाली, “आम्हाला लग्नाचा सोहळा लहान व खूप खासगी असावा जिथे मोजकेच लोक असतील आणि आमची रिसेप्शन पार्टी खूप असावी जिथे प्रत्येकाला मजा करता येईल असं वाटत होतं. मला कोणतंच टेन्शन घ्यायचं नव्हतं, त्यामुळे माझं घर ओपन हाऊस होतं. मी माझे केस आणि मेकअप करत होते व लोक आत-बाहेर फिरत होते, माझे मित्र-मैत्रिणी हँग आउट करत होते. एकीकडे सजावट सुरू होती तर दुसरीकडे जेवण चालू होते, मला असंच लग्न करायचं होतं. अत्यंत खासगी व सुंदर लग्न होतं, सगळं अगदी छान होतं.”

Video: ऐश्वर्या राय-आराध्या बच्चनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, बिग बींच्या नातीने वळून पाहिलं अन् पापाराझींना म्हणाली…

सोनाक्षी व झहीर यांनी सात वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २३ जून २०२४ रोजी लग्न केलं. दोघांचंही आंतरधर्मीय लग्न आहे. त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या रिसेप्शन सोहळ्यात सलमान खान, तब्बू, काजोल, रेखा, सायरा बानू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why sonakshi sinha wore saree for wedding with zaheer iqbal hrc