अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या ‘बवाल’ चित्रपटाचा टीझर आजच प्रदर्शित झाला. टीझरच्या सुरुवातीलचा वरुण आणि जान्हवीची रोमँट्रिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. पण शेवटचा सीन अंगावर काटा आणणार आहे. एक सुंदर प्रेमकहाणी वेगळ्याच वळणावर जाताना दिसत आहे. वरुण-जान्हवीचा ‘बवाल’ हा चित्रपट २१ जुलैला ‘ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी होऊ लागली आहे.

‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर ‘बवाल’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. आणि लिहिलं आहे की, “जर तू प्रेम करायला दिलं असतंच, तर किती प्रेम केलं असतं.” मनोज यांच्या या ट्वीटमुळेच नेटकऱ्यांनी ‘बवाल’चं कनेक्शन ‘आदिपुरुष’ जोडलं आहे. या कारणामुळे नेटकरी ‘बवाल’ चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहे.

Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
tula shikvin changalach dhada adhipati big misunderstanding about wife akshara
अधिपतीचा अक्षराबद्दल मोठा गैरसमज! ‘ते’ दृश्य पाहताच होणार राग अनावर, नव्या अभिनेत्याच्या एन्ट्रीमुळे मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”

हेही वाचा – लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा प्रभू अभिनय क्षेत्रातून घेणार ब्रेक; कारण…

हेही वाचा – संजय दत्तचा ‘त्या’ गाण्यावरील डान्स पाहून सरोज खान खुर्चीवरून पडल्या होत्या खाली; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?

मनोज यांच्या ट्वीट खाली एका नेटकऱ्यानं लिहिलं की, “ज्या चित्रपटाबरोबर मनोज जोडले गेले असतील तो चित्रपट आता बॉयकॉट होणार.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “आता तू काहीही कर. एकेकाळी तू सनातनी लोकांसाठी हिरो होतास आता तू झिरोच राहणार. तू विकलेला माल आहेस.” तसेच तिसऱ्यानं लिहिलंय की, “जो रामाचा नाही तो कोणाचाच नाही.”

दरम्यान, वरुण आणि जान्हवीच्या ‘वबाल’ चित्रपटाच्या टीझरनंतर आता ८ जुलैला ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. दुबईमध्ये ट्रेलर लाँच सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियावालानं केली आहे.

Story img Loader