शम्मी कपूर बॉलीवूडमधील डॅशिंग अभिनेते होते. शम्मी कपूर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘काश्मीर की कली’, ‘जानवर’, ‘तीसरी मंझिल’ हे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. आपल्या खास शैलीने त्यांनी चाहत्यांची मने जिंकली. शम्मी कपूर पडद्यावर जेवढे आनंदी दिसायचे तेवढेच ते खऱ्या आयुष्यात रागीट होते.
हेही वाचा- सेटवर मुलींच्या कपड्याबाबतच्या नियमावर सलमान खानने सोडले मौन, म्हणाला, ‘महिलांचे शरीर जितके…’
‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, शम्मी कपूर यांना इतर पुरुषांप्रमाणे मद्यपानाची आवड होती. एवढेच नाही तर ते दिवसाला १०० सिगारेटही ओढत असत. पण त्याच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीचा प्रवेश झाला की, त्याने अभिनेत्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. शम्मी कपूर यांची पत्नी नीला देवी यांनी ‘ईटाईम्स’ दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. नीला देवी म्हणाल्या, शम्मी कपूर यांना पटकन राग यायचा. त्यांना अनेक गोष्टी सांभाळता येत नव्हत्या. ते अस्वस्थ व्हायचे. चुकून त्यांच्या पायाचे बोट कोणी दाबले तर ते भडकायचे. या काळात हे सर्व घडणे सामान्य आहे. ते खूप दारू प्यायचे. दुसऱ्या दिवशी त्यांना अदल्या रात्री काय घडले हेच आठवायचे नाही. त्यामुळे ते मला विचारायचे, मी नेमकं काय घडलं हे सांगितल्यावर ते त्यामध्ये बदल करायचे.
हेही वाचा- “घाबरायचे कारण…” सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांबद्दल कंगना रणौतने मांडलं स्पष्ट मत
नीला देवी यांना विचारण्यात आले की, तिने शम्मी कपूर यांना दारू पिण्यापासून कधीच थांबवले नाही का? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ‘जेव्हा दारू आणि सिगारेट ओढण्याची वेळ येई तेव्हा ते कोणाचेही ऐकत नसत. एकदा दर वर्षीप्रमाणे १ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत त्यांनी कधीही दारू प्यायली नाही. कारण त्यांची पहिली पत्नी गीता बाली १ जानेवारी रोजी आजारी पडली २१ जानेवारीला त्यांचे निधन झाले. यानंतर त्यांनी दारूला पिणे खूप कमी केले होते. ते कधीकधी मद्यपान करायचे.
नीला देवी म्हणाल्या, माझ्या सासऱ्यांचे निधन झाल्यावर शम्मीजी मॉरिशसला गेले आणि तिथे आमच्या गुरुजींना भेटले. त्यांचे नाव हैदखानवाले बाबा. मी त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले. काही लोक त्यांना भोले बाबा या नावानेही ओळखतात. शम्मीजींनी त्यांच्या आधी इतर कोणत्याही बाबावर विश्वास ठेवला नव्हता. पण ते त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले. त्यांनी आमचे आयुष्य बदलले. माझा मुलगा आदित्य याचेही लग्न गुरुजींच्या आश्रमात झाले. जिथे ना लाईट होती ना कुठली सोय. तापमानही मायनसमध्ये होते. मात्र कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा- वडिलांबरोबर काम करण्याच्या अनुभवावर आर्यन खानचा मोठा खुलासा; म्हणाला..
शम्मी कपूर दिवसाला १०० सिगारेट ओढत असत. यामुळे त्यांच्या फुप्फुसांना इजा झाली. त्यांना किडनीचा त्रास कधीच झाला नाही. २००३ मध्ये त्यांची फुप्फुसे खराब झाली होती. रुग्णालयात महिनाभर ते व्हेंटिलेटरवर होते. ते खूप आजारी होते म्हणून त्यांना स्टिरॉइड्स आणि अँटीबायोटिक्स देण्यात आली. त्यांच्यावर डायलिसिस करण्यात येत होते तरीही ते सक्रिय होते, असे नीला देवी म्हणाल्या.