सध्या यश राज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’ची जबरदस्त चर्चा आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’पासून या स्पाय युनिव्हर्सची सुरुवात झाली. नुकताच सलमान खानचा ‘टायगर ३’देखील याच स्पाय युनिव्हर्समध्ये सामील झाला. ‘पठाण’मध्ये सलमानचा कॅमिओ आणि ‘टायगर ३’मध्ये शाहरुखचा कॅमिओ लोकांना पाहायला मिळाला अन् दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतकंच नव्हे तर आता या ‘यश राज स्पाय युनिव्हर्स’मध्ये हृतिक रोशनच्या ‘वॉर’ चित्रपटाचासुद्धा समावेश झाला असून ‘टायगर ३’मध्ये आपल्याला हृतिकचाही कॅमिओ पाहायला मिळाला. एकूणच ‘यश राज स्पाय’ युनिव्हर्समध्ये आणखी बऱ्याच घडामोडी पाहायला मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे. अशातच आता याबद्दल एक नवी अपडेट समोर येत आहे.

आणखी वाचा : रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओप्रकरणी पोलिसांना मिळाले नवे पुरावे; आरोपी लवकरच जाणार गजाआड

मीडिया रीपोर्टनुसार आता या ‘यश राज स्पाय युनिव्हर्स’मध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खानसुद्धा एन्ट्री घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. खुद्द सलमान खानने ही इच्छा व्यक्त केली आहे. ‘शोले’ चित्रपटातील पात्रांचा संदर्भ देत ‘झुम’शी संवाद साधताना सलमान म्हणाला, “मी विरू आहे आणि शाहरुख म्हणजे जय आहे. मी शाहरुखबरोबर ‘टायगर ३’मध्ये काम केलं, भविष्यात आमिरलाही यात यायचं असेल तर तोदेखील या स्पाय युनिव्हर्समध्ये सहभागी होऊ शकतो.”

सध्या या ‘स्पाय युनिव्हर्स’मध्ये ‘टायगर’, ‘पठाण’ व ‘कबीर’ अशी तीन पात्र आहे. भविष्यात यामध्ये आणखी बरीच नवी पात्रं आपल्याला पाहायला मिळू शकतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टायगर ३’ व ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर लवकरच आपल्याला या युनिव्हर्समध्ये ‘टायगर विरुद्ध पठाण’ हा चित्रपटही समोर येणार आहे. या चित्रपटाची घोषणाही लवकरात लवकर होणार याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will aamir khan join yash raj spy universe along with salman khan and shahrukh khan avn