प्रदर्शनाच्या तारखा बदलल्यानंतर आणि ट्रोलिंगनंतर टीझर बदलल्यानंतर अखेर बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ आज १६ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर त्यांचे रिव्ह्यू देत आहेत. अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफूलचे बोर्ड लागले आहेत. चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांची खूप पसंती मिळत असून चित्रपट व गाणी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. अशातच अनेकदा वादात सापडलेला हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड्स मोडेल का? अशी चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – ‘आदिपुरुष’मध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली आहे शुर्पणखाची भूमिका, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का

‘आदिपुरुष’ चित्रपटाशी संबंधित काही गोष्टी आणि आकड्यांवर नजर टाकल्यास चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करण्याची शक्यता आहे. यामध्ये चित्रपटाच्या तिकिटांचं अॅडव्हान्स बुकिंग, केरळमध्ये चित्रपटाच्या तिकीटाचे दर वाढविण्यास मिळालेली परवानगी, दुसरा चित्रपट रिलीज होत नसल्याने त्याचा फायदा तसेच दाक्षिणात्य व बॉलिवूड कलाकारांकडून मिळणारा पाठिंबा या सर्व गोष्टींचा समावेश आहे. यासंदर्भात ‘एबीपी लाइव्ह’ने वृत्त दिलंय.

Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले…

चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग

आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर सुधार करून पुन्हा प्रदर्शित केल्यानंतर युट्यूब व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर चांगलाच ट्रेंड होऊ लागला. या चित्रपटातील गाणीही लोकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यावरील रील्स खूप व्हायरल होत आहेत. परिणामी अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटाची १ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली.

कोणत्याही चित्रपटासोबत स्पर्धा नाही

आज बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ शिवाय कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे चित्रपटाला स्पर्धा नाही. अजय देवगणचा ‘मैदान’ देखील एका आठवड्यानंतर म्हणजेच २३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

केरळ सरकारने तिकिटाचे दर वाढवण्यास दिली परवानगी

केरळ सरकारनेही प्रत्येक तिकिटावर ५० रुपयांची वाढ करण्यास परवानगी दिली आहे. तसेच रोजचे सहा शो वाढवण्यासही मंजुरी दिली आहे, त्यामुळे चित्रपटाला फायदा होऊ शकतो.

कलाकारांचा मिळतोय पाठिंबा

या चित्रपटाला बॉलिवूडसह दाक्षिणात्या कलाकारांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. या कलाकारांनी बरीच तिकिटं विकत घेतली आहेत आणि ती गरीबांना वाटली आहेत. रणबीर कपूरनेही चित्रपटाची १० हजार तिकिटं खरेदी केली आहेत.

ऑनलाइन तिकिटांची विक्री

ऑनलाइन तिकीट विक्रेत्यांच्या रिपोर्टनुसार, हैदराबादमध्ये चित्रपटाचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यानंतर काही तासांतच या चित्रपटाची ९० टक्के तिकिटे विकली गेली असं म्हटलं जातंय. मुंबई, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद आणि दिल्लीसारख्या इतर प्रमुख शहरांमध्ये ऑनलाइन तिकिटं विकली गेली. याच वेगाने चित्रपटाची ऑनलाइन तिकिटं बूक झाल्यास चित्रपट १००० कोटींचा टप्पा ओलांडू शकतो, असं म्हटलं जातंय. यासोबतच उत्तर अमेरिकेतही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे.