आर्थिक घोटाळे करुन फरार झालेले विजय माल्या, नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून ‘फाइल नं ३२३’ असं सिनेमाचं नाव असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अनुराग कश्यप या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार असल्याची चर्चा आहे. बॅंकांची फसवणूक करुन फरार असलेला विजय मल्याच्या भूमिकेत अनुराग दिसणार असल्याची माहिती आहे. या भूमिकेसाठी दिग्दर्शक कार्तिकने अनुरागशी संपर्क केल्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून अ‍ॅक्शन सीन यामध्ये पाहायला मिळणार आहेत. ‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी अनुरागच्या लूकमध्ये बदलही करण्यात येणार आहे.

हेही वाचा >> आलिया पाठोपाठ ‘रसोडे में कौन था’ फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, बाळाचा फोटो शेअर करत म्हणाली…

हेही वाचा >> ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील उत्कर्षच्या लूकचे पोस्टर शेअर करत आदर्श शिंदे म्हणाला, “तू दिवस-रात्र…”

विजय मल्याने भारतातून पळ काढल्यानंतरचे त्याच्या लॅव्हिश लाइफस्टाइलचे दर्शन या चित्रपटातून घडविण्यात येणार आहे. एका राजाप्रमाणे असलेलं त्याचं आयुष्य, त्याच्या अवतीभोवती असलेल्या ग्लॅमरस मॉडेल्स, पार्टी या सगळ्यावर चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार असल्याची माहिती आहे. ‘फाइल नं ३२३’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा >> आलिया भट्टनंतर बिपाशा बासूही गुडन्यूज देण्याच्या तयारीत, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘दोबारा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. याआधी अनुराग कश्यपने गॅंग, एके वर्सेस एके, ब्लॅक फ्रायडे, नो स्मोकिंग देव डी या चित्रपटातून त्याच्या अभिनयाची छाप पाडली आहे.