कलाकारांबरोबरच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचीदेखील मोठी चर्चा होताना दिसते. त्यांची मुले काय करतात, पालकांप्रमाणेच तीदखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणार का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

काजोल-अजय देवगणची लेक करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण?

आता लोकप्रिय अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगण मोठ्या चर्चेत आली आहे. न्यासाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतीच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने सोशल मीडियावर न्यासाचे काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये तिने सुंदर लेहंगा परिधान केल्याचे पाहायला मिळाले. या फोटोंमुळे न्यासाची जितकी चर्चा झाली, तितकीच मनीष मल्होत्राने दिलेल्या कॅप्शनमुळेही न्यासाची चर्चा झाली. त्याने लिहिलेल्या कॅप्शनमुळे न्यासा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार का, अशा चर्चा होत असल्याचे पाहायला मिळाले.

मनीष मल्होत्राने सोशल मीडियावर न्यासा देवगणचे काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये न्यासाने सोनेरी व गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केल्याचे पाहायला मिळाले. हे फोटो शेअर करताना मनीष मल्होत्राने न्यासा देवगणला टॅग करीत लिहिले, “न्यासा, सिनेसृष्टी तुझी वाट पाहत आहे. ‘इवारा’ (Evara) कलेक्शनमधील भारतीय कारागीरांनी भरतकाम केलेला आणि हातांनी विया णलेल्या लेहंग्यामध्ये तू खूप सुंदर दिसत आहेस.”

मनीष मल्होत्राने शेअर केलेल्या पोस्टवर न्यासाची आई काजोलने हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले. तर, न्यासाचा मित्र ओरीने लिहिले की, तुझे बॉलीवूडमधील पदार्पण पाहण्यास मी उत्सुक आहे. गायिका कनिका कपूरने सुंदर अशी कमेंट केली. कलाकारांबरोबरच चाहत्यांनीदेखील न्यासाचे कौतुक केले. एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर”. आणखी एका नेटकऱ्याने काजोलला टॅग करीत लिहिले, “खूप सुंदर. तुझी फोटो कॉपी आहे”.

आता चाहते काजोल व अजय देवगणची मुलगी बॉलीवूडमध्ये कधी पदार्पण करणार, असा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून, चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी ‘न्यूज १८’बरोबर संवाद साधला होता. त्यावेळी तिने मुलीच्या बॉलीवूडच्या पदार्पणाविषयी वक्तव्य केले होते. तिने म्हटले होते की, ती आता २२ वर्षांची होईल. सध्या तरी बॉलीवूडमध्ये यायचे नाही, असा तिचा विचार आहे. त्यामुळे काजोलची लेक न्यासा आता कोणत्या क्षेत्रात करिअर करणार आणि भविष्यकाळात ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.