बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटांबरोबरच सलमान त्याच्या वादांमुळेही बराच चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी साजिद नाडियादवाला देखील सलमानच्या या चित्रपटाचा भाग होता, परंतु एकमेकांतील मतभेदांमुळे दोघांनी एकत्र काम करायचे टाळले. आता साजिद आणि सलमान पुन्हा एकदा दुसऱ्या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साजिद याआधी सलमानबरोबर त्याच्या आगामी चित्रपटाचा भाग बनणार होते, परंतु साजिद यांनी परस्पर भांडणामुळे चित्रपटाला अलविदा केला. मात्र, याचा सलमान आणि साजिदच्या मैत्रीवर काहीही परिणाम झाला नाही. सलमानच्या आगामी चित्रपटात दोघांची जोडी दिसणार नसली तरी आता ‘किक २’ या चित्रपटामध्ये ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.
आणखी वाचा : “हा ** आहे पण…” ‘गो गोवा गॉन’ची स्क्रिप्ट ऐकून सैफ अली खानने दिलेली ही प्रतिक्रिया; राज आणि डीकेचा खुलासा
सलमान किंवा साजिद या दोघांपैकी कुणीच त्यांच्यात झालेल्या मतभेदांबद्दल उघडपणे भाष्य केलं नाही. त्यामुळे नेमकं कोणत्या मुद्दयावरुन या दोघांमध्ये मतभेद झाले होते ती गोष्ट समोर आलेलीच नाही. पण आता सलमानचे चाहते त्याच्या ‘कीक २’साठी चांगलेच उत्सुक आहेत.
सलमानचा ‘किक’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवरही तो जबरदस्त हिट ठरला होता. याशिवाय सलमान त्याचा ‘टायगर 3’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यांना भेट देणार आहे. या चित्रपटात सलमानबरोबर शाहरुख खानही दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निश्चित झाली आहे. सध्या सलमानचे चाहते त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत.