अभिनेता सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर रविवारी पहाटे गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर त्याच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली असून अनेक सेलिब्रिटी व राजकीय नेत्यांनी अभिनेत्याची भेट घेतली आहे. अशातच गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये त्याच्या आई-वडिलांबरोबर राहतो. गोळीबाराची घटना घडल्यानंतर सलमानचे वडील सलीम खान त्यांच्या वांद्रे येथील घरातून दुसरीकडे राहायला जाण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसून सलमान खानचा गॅलेक्सी अपार्टमेंट सोडण्याचा कोणताही विचार नाही. तो घर बदलणार नसून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येच राहणार आहे.

Income Tax raid on BJP MLA Harvansh Singh Rathore
भाजपाच्या माजी आमदाराच्या घरात आढळल्या मगरी; भ्रष्टाचार प्रकरणात प्राप्तीकर विभागाने धाड टाकताच अधिकारीही चक्रावले
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Hasan Mushrifs statement regarding post of Guardian Minister of kolhapur
पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जायचंय – हसन मुश्रीफ
Dhananjay Munde News
Dhananjay Munde : धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित, विचारताच म्हणाले; “मी राजीनामा….”
Junaid Khan And Reena Dutta
आमिर खानच्या मुलाला होता ‘हा’ आजार; ‘तारे जमीन पर’ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर झालेली जाणीव, जुनैद खानचा खुलासा
Vaibhav Naik On Rajan Salvi
Vaibhav Naik : “मला आणि राजन साळवींना शिंदे गटाकडून…”, वैभव नाईक यांचा मोठा गौप्यस्फोट
sonu sood denied salman khan for dabang 2
सलमान खानने सोनू सूदला दिली होती ‘दबंग २’ची ऑफर, अभिनेत्याने ‘या’ कारणामुळे नाकारला होता चित्रपट; म्हणाला…
Girish Mahajan On Congress
Girish Mahajan : काँग्रेसमध्ये लवकरच राजकीय भूकंप? गिरीश महाजनांचा मोठा दावा; म्हणाले, “अनेक नेते आमच्याकडे येण्यासाठी…”

Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सिनेसृष्टीतही खळबळ उडाली आहे. अभिनेत्याच्या घरावर गोळ्या झाडल्याची जबाबदारी तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोईने घेतली आहे. त्याची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने हल्ल्याची जबाबदारी घेत हा फक्त ट्रेलर होता असं म्हटलंय.

सलमानच्या घराबाहेर गोळीबार, वडील सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना फक्त…”

मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दोन्ही हल्लेखोरांचे फोटो सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आले आहे. दोघेही दुचाकीवर बसून सलमानच्या घरासमोर आले होते, तिथे गोळ्या झाडून नंतर ते तिथून निघून गेले.

Story img Loader