दोन आठवड्यांपूर्वी (१४ एप्रिलला) सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील घरावर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या गोळीबाराच्या घटनेवर सलमान खानचा भाऊ अरबाज खानने प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे कुटुंबीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर सोडतील का? असं विचारल्यावर अरबाजने उत्तर दिलं आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर खान कुटुंब गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून दुसरीकडे राहायला जाणार का? असं विचारल्यावर तो म्हणाला “असं केल्याने सगळं ठीक होईल असं तुम्हाला वाटतं? नवीन ठिकाणी राहायला गेल्याने किंवा घर बदलल्याने येणारा धोका टळेल, असं खरंच होईल का? असं असतं तर नक्कीच घर बदलण्याचा विचार कोणीही करेल, पण घर बदलल्याने हा धोका टळणार नाही हे सत्य आहे. त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगून आयुष्यात पुढे जावं लागेल.”

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”

अरबाजने सांगितलं की त्याचे वडील, ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान अनेक दशकांपासून त्या घरात राहत आहेत. त्याचा भाऊ सलमानही बऱ्याच काळापासून याच घरात राहत आहे. “ते त्याचं घर आहे,” असं अरबाज सलमानबद्दल म्हणाला. सलमानचे घर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आहे आणि भाईजानची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्याच्या घराबाहेर गर्दी करत असतात.

श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

“हे ठिकाण सोडा आणि आम्ही तुम्हाला काहीच करणार नाही, असं कुणी म्हणत नाहीये. अशावेळी एखादी व्यक्ती एकच गोष्ट करू शकते ती म्हणजे खबरदारी घेणं. त्याशिवाय खासगी किंवा सरकारने पुरवलेली सुरक्षा व्यवस्था वापरू शकते. जितकं सामान्य जगता येईल तितकं सामान्य जगायचा प्रयत्न करू शकते. जर एखादी व्यक्ती सतत भीतीत किंवा धमकीत जगत असेल तर ती घराबाहेर पडू शकणार नाही,” असं अरबाज खानने नमूद केलं.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

१४ एप्रिल रोजी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सलमानच्या घरावर पाच राऊंड गोळीबार केला. ही घटना घडली तेव्हा सलमान आणि त्याचे कुटुंबीय घरात होते. यात कोणीही जखमी झालं नाही. यानंतर पोलिसांनी कारवाई करत गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना १५ एप्रिल रोजी गुजरातमधील भुज इथून अटक केली होती.

Story img Loader