सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाचा प्रदर्शित होताच त्यावर टीका होत आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चित्रपटाची कथा चार महिलांची आहे ज्यांना मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या चित्रपटावर भाष्य केलं. हा ‘आरएसएस’चा अजेंडा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर असे चित्रपट काढणारी मंडळी लव्ह जिहादचा मुद्दा उचलून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचंही पिनराई यांइ स्पष्ट केलं.

आणखी वाचा : “ए आर रेहमान श्रीकृष्णासारखा दिसायचा…” गुलजार यांनी सांगितली एक खास आठवण

चित्रपटाची कथा ही अदा शर्माच्या पात्राबद्दल भाष्य करणारी आहे जीचं धर्मपरिवर्तन करून तिला ISIS मध्ये सामील करण्यात आलं. तब्बल ३२००० महिलांना अशाप्रकारे ISIS मध्ये भरती करण्यात आल्याचा दावादेखील हा चित्रपट करत आहे.

चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनीदेखील ही सत्य घटना असल्याचं स्पष्ट केलं. एकूणच हा चित्रपट आणि याभोवती निर्माण झालेला वाद बघता ‘द काश्मीर फाइल्स’ची लोकांनी आठवण काढली. गेल्यावर्षी विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपटही अशाच ज्वलंत विषयामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या वादाचा चित्रपटाला चांगलाच फायदाही झाला, प्रेक्षकांनी चित्रपट डोक्यावर उचलून धरला. या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक कमाई केली. असंच यश ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला मिळू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘द काश्मीर फाइल्स’वेळी प्रेक्षक २ वर्गांमध्ये विभागले गेले काहींनी चित्रपटाला उचलून धरलं तर काहींनी यावर प्रचंड टीका केली. तसंच चित्र सध्या ‘द केरळ स्टोरी’च्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळेच हा चित्रपटही चांगलाच यशस्वी होऊ शकतो अशी शक्यता सिनेतज्ञ आणि समीक्षक वर्तवत आहेत. IMDb नुसार २०२३ च्या बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत ‘द केरळ स्टोरी’ टॉपवर आहे. इतकंच नव्हे तर यात या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि प्रभासच्या ‘आदिपुरुष’लाही मागे टाकलं आहे.

imdblist

कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील या चित्रपटावर टीका केली. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, “कदाचित ही ‘तुमच्या’ केरळची कथा असू शकते, पण ही ‘आमच्या’ केरळची कथा बिलकुल नाही.” या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी या चार अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ५ मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will the kerala story become massive hit like the kashmir files here is business trend analysis avn
Show comments