बाबा सिद्दीकी यांच्या घरी इफ्तार पार्टी होती. बाबा सिद्दीकी दरवर्षी इफ्तार पार्टी आयोजित करतात. सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आहे. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी त्यांच्या इफ्तार पार्टीत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खान आणि सलमान खानची जोडी या पार्टीचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. दरम्यान या पार्टीतील सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा- फ्लॉप चित्रपटानंतर आमिर खानला आणखी एक मोठा धक्का; ‘धूम ४’ मध्ये घेण्यास आदित्य चोप्राचा नकार
बुरखा घातलेली एक महिला गर्दीत सलमान खानसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, बाबा सिद्दीकी सलमानला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत दिसत आहेत. ते सलमानला गर्दीतून पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, पण सलमान थांबतो आणि महिलेसोबत फोटो काढल्यानंतरच पुढे जातो. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाली आहे. सलमानने चाहतीला सेल्फी दिल्यामुळे लोक त्याचे कौतुक करत आहेत.
व्हिडिओवर नेटकऱ्यांची कमेंट
या व्हिडिओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे, “अरे, एवढी काय गडबड आहे. फोटो तर काढू द्या”. तर दुसर्याने लिहिले आहे की, “सलमान भाई त्याच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही”. तर काही जणांनी “सल्लू भाई रॉक्स” म्हणत सलमानचे कौतुक करताना दिसत आहे.