एकदिवसीय विश्वचषकाला ५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय फलंदाज विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. विराटची ही पोस्ट रिशेअर करत अनुष्का शर्मानेही चाहत्यांना एक विनंती केली आहे. ही पोस्ट नेमकी काय आहे जाणून घेऊया…
हेही वाचा : गिरीजा ओक आणि सई ताम्हणकर ‘अशा’ झाल्या खास मैत्रिणी; अभिनेत्री म्हणाली, “ती माझ्या आजोबांकडे…”
एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीचे अनेक चाहते आणि मित्र त्याच्याकडे वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी तिकिटांबाबत विचारणा करत आहेत. म्हणूनच विराट त्याच्या पोस्टमध्ये लिहितो, “विश्वचषक जसजसा जवळ येत आहे, तसे माझे मित्र मला सामने पाहण्यासाठी स्टेडियमधील तिकिटं मिळावी यासाठी विनंती करत आहेत. मी सर्वांना सांगू इच्छितो की, या संपूर्ण स्पर्धेदरम्यान माझ्याकडे तिकिटांसाठी विचारपूस करू नका. कृपया घरी बसून मॅचचा आनंद घ्या…”
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नवऱ्याची ही पोस्ट रिशेअर केली आहे. यात ती म्हणते, “विराटच्या मेसेजमध्ये मी एक गोष्ट जोडू इच्छिते. कृपया, जर तुमच्या मेसेजकडे दुर्लक्ष केलं, तर यासाठी (वर्ल्डकप तिकिटांसाठी) माझी मदतही मागू नका. आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.”
हेही वाचा : ‘बिग बॉस’च्या आठवणीत रमली ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनी लोणारी, म्हणाली, “मैलाच्या दगडासारखा…”
दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्माकडे त्यांचे अनेक मित्र मॅच पाहण्यासाठी तिकिटं मागतात हे यावरून स्पष्ट होतं. त्यामुळे आता विश्वचषक सुरू होण्यापूर्वी कोणीही तिकिटांसाठी त्रास देऊ नये याकरता विराटने ही पोस्ट केली आहे. याशिवाय अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच ती ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.