आजकाल बऱ्याच चित्रपटांमध्ये किसिंग सीन व बोल्ड सीन असतात. पण एका चित्रपटात सर्वात जास्त किसिंग सीन होते, तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात आघाडीचे बॉलीवूड कलाकार होते. बोल्ड व किसिंग सीनचा भरमार होता, पण तरीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वाईट कामगिरी केली होती. इतकंच नाही तर या चित्रपटाला आयएमडीबीने वाईट रेटिंग दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता इमरान हाश्मीला बॉलीवूडचा सिरीयल किसर म्हणतात. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हा चित्रपट कदाचित त्याचा असेल, पण असं नाही. या चित्रपटात इमरान हाश्मीची को-स्टार सोनल चौहान होती. या चित्रपटात तब्बल ३० किसिंग सीन होते.

कोणता आहे हा चित्रपट?

या चित्रपटाचे नाव ‘3G अ किलर कनेक्शन’ असं आहे. हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट होता. हा चित्रपट १२ वर्षांपूर्वी २०१३ साली रिलीज झाला होता. यामध्ये अभिनेता नील नितिन मुकेश व अभिनेत्री सोनल चौहान यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट बोल्ड व किसिंग सीनमुळे खूप चर्चेत राहिला होता.

चित्रपटात होते ३० किसिंग सीन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 3G चित्रपटात तब्बल 30 किसिंग सीन होते. या चित्रपटाने इमरान हाश्मी व मल्लिका शेरावत यांच्या ‘मर्डर’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला होता. कारण ‘मर्डर’ सिनेमात २० किसिंग सीन होते. या चित्रपटात इतके बोल्ड सीन होते, तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता.

3G चे IMDb रेटिंग

‘3G अ किलर कनेक्शन’ चित्रपटावर प्रचंड टीका झाली होती. हा चित्रपट अत्यंत वाईट असल्याचं लोकांचं म्हणणं होतं. आयएमडीबीवरही या चित्रपटाला वाईट रेटिंग मिळाले होते. आयएमडीबीने या सिनेमाला ३.६ रेटिंग दिले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. जगभरात या सिनेमाने फक्त ५.९ कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘3G अ किलर कनेक्शन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शांतनू राय छिब्बर व शिर्षक आनंद यांनी केलं होतं. त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली होती. हा १२५ मिनिटांचा चित्रपट जगभरात १५ मार्च २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worst bollywood movie 3g a killer connection flop 30 kissing scenes sonal chauhan hrc