ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट थिएटर्समध्ये पाहिल्यानंतर सोशल मीडियावर यामधील डायलॉग व व्हीएफएक्सची चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेले डायलॉग ऐकून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. रामायणमधील हनुमान अशी भाषा खरंच बोलायचे का? असे प्रश्नही नेटकरी विचारत आहेत. या संपूर्ण वादावर संवादाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Photos: “इसके पेट पे बाण मारिए प्रभू”, ‘आदिपुरुष’ पाहिल्यानंतर इंटरनेटवर मीम्सचा पाऊस; तुम्हीही पोट धरून हसाल

या वादानंतर मनोज मुंतशीर यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला मुलाखत दिली. हनुमानाच्या ज्या संवादावरून नेटकरी ट्रोल करत आहेत, ते संवाद जाणीवपूर्वक तसेच लिहिले असल्याचं मनोज मुंतशीर यांनी म्हटलंय. “आताच्या पिढीला संवाद कनेक्ट व्हावे, त्यामुळे तशा भाषेत डायलॉग लिहिले आहेत. फक्त हनुमानाबद्दलच का बोलले जात आहे? भगवान श्रीरामांच्या संवादांवरही बोलले पाहिजे. माता सीतेचे संवाद जिथे ती आव्हान देते त्याबद्दल बोलले पाहिजे,” असंही ते म्हणाले.

“जलेगी तेरे बाप की…”, ‘आदिपुरुष’मध्ये हनुमानच्या तोंडी असलेला ‘तो’ संवाद ऐकून प्रेक्षकांचा संताप, संपूर्ण डायलॉग नेमका काय?

हे जाणीवपूर्वक लिहिण्यात आलंय का? असं विचारलं असता ते म्हणाले, “निश्चितच हे संवाद जाणीवपूर्वक असे लिहिण्यात आले आहेत. हनुमानाचे संवाद पूर्ण विचार करून लिहिले आहेत. आम्ही ते सोपे ठेवले आहे. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की चित्रपटात अनेक पात्रे असतील तर प्रत्येकाला एकच भाषा बोलता येत नाही. त्यामध्ये वैविध्य असेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

“रावण अली खिलजी, प्रभू येशू, उर्फी जावेद अन्…”, ‘आदिपुरुष’ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “ओम राऊत तू…”

मनोज पुढे म्हणाले, “आम्ही लहानपणापासून रामायण ऐकत आलो आहोत. मी एका छोट्या गावातून आलो आहे. आमच्या गावी आमची आजी जेव्हा गोष्टी सांगायची तेव्हा ती याच भाषेत सांगायची. या देशाचे महान संत, या देशातील महान कथाकार मी लिहिल्याप्रमाणे संवाद बोलतात, असे संवाद लिहिणारा मी पहिला नाही, ते पूर्वीपासून म्हटले जात आहेत.”

“कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की” असा संवाद हनुमानाच्या तोंडी आहे. हा संवाद ऐकून प्रेक्षकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. हनुमानाचा असा संवाद कसा काय असू शकतो? असं प्रेक्षक म्हणत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer manoj muntashir reaction on hanuman controvarisal dialouge in adipurush hrc
Show comments