बॉलीवूडचा किंग शाहरुख खान नेहमी चर्चेत असतो. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुखने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. जगभरात शाहरुखचे लाखो चाहते आहेत. केवळ सामान्य लोकच नाही तर प्रसिद्ध सेलिब्रिटींनाही शाहरुखचे वेड लागले आहे. अनेक कलाकार किंग खानचे कौतुक करताना दिसतात. या यादीत एक नाव आहे WWE चॅम्पियन जॉन सीनाचे. जॉन अनेकवेळा शाहरुख खानची स्तुती करताना दिसला आहे. आता त्याने शाहरुखचे प्रसिद्ध गाणे गुणगुणले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शाहरुख खानचे स्टारडम भारतातच नाही तर परदेशातही बघायला मिळते. अनेक परदेशी कलाकार शाहरुखचे चाहते आहेत. यामध्ये WWE सुपरस्टार जॉन सीनाचाही समावेश आहे, नुकत्याचा त्याच्या नव्या व्हिडिओने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडीओमध्ये जॉन ‘दिल तो पागल है’ मधील शाहरुख खानचे लोकप्रिय गाणे ‘भोली सी सूरत’ गाताना दिसत आहे. शाहरुख खानच्या एका फॅन पेजने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये आपण जॉन सीनाला शाहरुखवर चित्रित झालेले गाणे गाताना चाहते खूप खूश झाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहे. ‘भोली सी सूरत’ हे गाणे १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील गाजलेले गाणे आहे. उदित नारायण व लता मंगेशकर यांनी या गाण्याला आवाज दिला. हे गाणे रिलीज होऊन २७ वर्ष झाली तरी या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.
हेही वाचा- रश्मिका मंदाना म्हणाली, “..आणि मी मरता मरता वाचले”, पोस्ट केला ‘तो’ फोटो
शाहरुखच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, २०२३ वर्ष त्याच्यासाठी खूप खास ठरले. गेल्यावर्षी त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. जवान, पठाण व डंकी. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता शाहरुख खान पुढे KGF स्टार यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.