बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला. याबाबत यामीने आज ( २० मे ) इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तसंच बाळाचं नाव काय ठेवलं याचा खुलासा देखील तिने या पोस्टद्वारे केला आहे.

यामी गौतम काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला तिचा दिग्दर्शक पती आदित्य धर याने अभिनेत्री लवकरच गुडन्यूज देणार असल्याचं जाहीर केलं होतं. १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं. परंतु, बरोबर दहा दिवसांनी म्हणजेच आज ( २० मे ) यामीने ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
January Born Babies
January Born Baby Names : जानेवारी महिन्यात जन्मलेल्या बाळांचे ठेवा हटके नावं, ऐकताक्षणीच आवडेल सर्वांना
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
13 yr old sadhvi in mahakumbh
महाकुंभ मेळ्यामध्ये साध्वी होणार IAS अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणारी मुलगी; चर्चेत असलेली राखी सिंह कोण आहे?
Farhan Akhtar Shibani Dandekar pregnancy
फरहान अख्तर ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा होणार? मराठमोळी सून गरोदर असल्याच्या चर्चांवर सावत्र सासूबाई शबाना आझमी म्हणाल्या…

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीच्या ‘त्या’ कमेंटवर चक्क श्रद्धा कपूरने दिलं उत्तर! स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाली…

यामी तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “१० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आम्हाला मुलगा झाला. आम्ही आमच्या बाळाचं नाव ‘वेदविद’ असं ठेवलं आहे. वेदविद म्हणजे चांगले वेद, संस्कार जाणणारा…आम्ही दोघं आता पालकत्वाच्या सुंदर अशा प्रवासाला सुरुवात करत आहोत. आमच्या बाळाच्या उज्ज्वल भविष्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. माझा मुलगा आपल्या देशासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी अभिमानास्पद कामगिरी करेल अशी आशा मी व्यक्त करते.”

हेही वाचा : ऐश्वर्या राय बच्चनच्या हाताला नेमकं झालंय तरी काय? अभिनेत्रीवर लवकरच शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती

यामी गौतम व आदित्य धरचा विवाहसोहळा ४ जून २०२१ रोजी पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील यामीच्या घरी हा लग्नसोहळा पार पडला होता. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी यामी व आदित्यने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटानंतर दोघेही काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. आता लग्नाच्या तीन वर्षांनी यामी आणि आदित्य आई-बाबा झाले आहेत. या दोघांनी बाळाचं ‘वेदविद’ हे नाव ठेवलं असून सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

दरम्यान, यामी गौतमच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने ‘विकी डोनर’ चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर आयुष्मान खुरानाने प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय गेल्या वर्षी तिचा ‘OMG 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर, आई होण्याआधी ती ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटात झळकली होती.

Story img Loader