यामी गौतम हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जाहिरातीतून प्रसिद्धीझोतात आलेल्या या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यामी लवकरच गुड न्यूज देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री यामी गौतमचा पती आणि चित्रपट निर्माता आदित्य धर याने ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात यामी लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली. यामी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे या जोडप्याने सांगितले.

हेही वाचा… आलिशान बंगला सोडला, लक्झरी गाडी विकली, चित्रपटसृष्टीपासूनही दूर; अभिनेता इम्रान खान सध्या करतोय तरी काय?

आदित्य धर याने आपल्या भावना व्यक्त करत सांगितले, “आमचं बाळ लवकरच या जगात येणार आहे. जेव्हा हा चित्रपट तयार झाला आणि आम्हाला ही गोड बातमी कळाली, तेव्हा तो काळ आमच्यासाठी अविस्मरणीय होता. हा क्षण आम्हाला अभिमन्यूसारखा वाटत आहे. ज्याप्रकारे अभिमन्यूने आईच्या गर्भातच सगळं अनुभवलं होतं तसंच ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट कसा तयार झाला हे बाळाला माहीत असणार आहे आणि या विचारानेच मी खूप भारावून गेलो आहे. ती लक्ष्मी आहे की गणेश हे आम्हाला अजून ठाऊक नाही.”

यामी गौतमनेही गरोदरपणाचा प्रवास आणि शूटिंगचा अनुभव याविषयीचे तिचे विचार शेअर केले. मानसिकदृष्ट्या ती थोडी अस्वस्थ होती आणि आई होण्याचा पहिला अनुभव असल्याने सगळ्या गोष्टी तिच्यासाठी खूप विशेष आणि आव्हानात्मक होत्या. यामीच्या प्रत्येक प्रवासात आदित्य नेहमी तिच्यासह असल्याने यामीने कृतज्ञता व्यक्त केली. पती आणि इतरांचा पाठिंबा मिळाल्याने सर्वांचे तिने आभार मानले.

हेही वाचा… ऐश्वर्या रायने घटस्फोटाच्या चर्चांना दिला पूर्णविराम; अभिषेक बच्चनच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोने वेधलं लक्ष

लग्नाच्या तीन वर्षांनंतर हे जोडपं आई-बाबा होणार आहे. दरम्यान, यामी गौतम तिच्या आगामी थ्रिलर ‘आर्टिकल ३७०’ च्या प्रमोशनची तयारी करत आहे. ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट यामीचा पती आदित्य धर याने निर्मित केला आहे. २०१९ मध्ये ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’च्या सेटवर भेटलेल्या या जोडप्याने दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर ४ जून २०२१ रोजी लग्न केलं.