अभिनेत्री यामी गौतमचा २८ नोव्हेंबर २०२४ रोजी ३६ वा वाढदिवस होता. या खास प्रसंगी तिचा पती आदित्य धरने तिला इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या असून, त्याने काही फोटोज पोस्ट केले आहे. या फोटोतून त्याने यामीच्या चाहत्यांना एक अप्रतिम भेट दिली. त्याने यामीच्या वाढदिवशी त्यांच्या मुलाचा पहिला फोटो शेअर केला आहे. त्याने यामीसाठी वाढदिवशी खास पोस्ट लिहीत ही छायाचित्रे शेअर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्य धरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पत्नी यामी गौतमचे तीन फोटो शेअर केले. त्यामधील पहिल्या फोटोत यामी उन्हात बसून कॉफीचा आनंद घेताना, दुसऱ्या फोटोत ती मस्ती करीत मजेशीर पोज देताना दिसते. तर, तिसऱ्या फोटोत यामीने मुलगा वेदविदला कडेवर घेतले आहे; मात्र या फोटोमध्ये तिच्या मुलाचा चेहरा दिसत नाही.

हेही वाचा…प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचं वयाच्या १८ व्या वर्षी अपघाती निधन; मित्राला झाली अटक

पाहा फोटो –

तिसऱ्या फोटोत यामीने मुलगा वेदविदला कडेवर घेतले आहे.(Photo Credit – Aditya Dhar Instagram)

आदित्य धरने फोटो शेअर करत लिहिले लक्षवेधी कॅप्शन

हे फोटो शेअर करीत आदित्य धरने लिहिले, “हॅपी बर्थडे माझी बेटर हाफ. लव्ह यू वेदूची मम्मी.” या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दाखवीत कमेंट्स केल्या आहेत. त्यांनी यामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि क्यूट वेदूवरही प्रेमळ कमेंट्स केल्या आहेत. यामी गौतमनेही आदित्यचे आभार मानत लिहिले, “awww.. थँक यू वेदूचे पप्पा.”

हेही वाचा…इरफान खानच्या निधनाचं दु:ख आजही कायम, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितले अभिनेत्याचे शेवटचे क्षण; म्हणाला, “तो मानसिकरित्या…”

आदित्य धर आणि यामी गौतम यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी ४ जून २०२१ रोजी लग्न केले होते. १० मे २०२४ रोजी ते मुलाचे पालक झाले. आई झाल्यानंतर यामी गौतम अभिनयापासून दूर होती. मात्र, सध्या ती पुन्हा कामावर परतली असून, तिने आपल्या आगामी प्रोजेक्टचे शूटिंग सुरू केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yami gautam birthday turns special when aditya dhar shares first glimpse of son vedvid with heartfelt wishes psg