यामी गौतम ही आजच्या पिढीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री. आज तिचा वाढदिवस आहे. यामी गौतमचा जन्म हिमाचल प्रदेशच्या बिलासपुर येथे झाला. लहानपणाासून ती थोडी लाजरी बुजरी होती. एका सामान्य मुलीसारखी ती होती. मोठं होऊन अभिनेत्री व्हावं असं तिचं कधीही स्वप्न नव्हतं. तिला IAS ऑफिसर व्हायचं होतं. पण एक दिवस असं काही घडलं की ती थेट बॉलिवूडची अभिनेत्री झाली.
एक दिवस यामीच्या घरी पाहुणे आले होते. यामीच्या बाबांच्या मित्राची पत्नी टेलिव्हिजन अभिनेत्री होती. घरी येताच तिने यामीला पाहिलं आणि तिनं यामीच्या घरच्यांना यामीमध्ये अभिनयाचं टॅलेंट असल्याचं सांगितलं. घरी आलेल्या त्या अभिनेत्रीने यामीला थिएटर जॉइन करण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी यामीचं फोटोशूट केलं आणि ते फोटो मुंबईच्या एका बड्या प्रोडक्शन हाऊसला पाठवले.
आणखी वाचा : Video: आकर्षक पेंटिंग्स ते छोटंसं किचन…’अशी’ आहे करण जोहरची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन
त्यावेळी यामी लॉचा अभ्यास करत होती. पण तेव्हा काही तिचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. तिनं लॉचा अभ्यास सोडण्याचा निर्णय घेतला. अभ्यास सोडल्यानंतर तिच्या आईनं तिला अभिनय करून बघ असा सल्ला दिला. त्यानंतर यामीनं मॉडेलिंग सुरू केलं. अशातच तिला ‘फेअर अँड लव्हली’ची जाहिरात मिळाली आणि यामीचं आयुष्यचं बदलून गेलं. त्या जाहिरातीत झळकल्यावर ती घराघरात पोहोचली.
हेही वाचा : “जे घडून गेलं ते…” बॉलिवूडमधील नेपोटीजमवर उत्तर देणाऱ्या अभिनेत्री यामी गौतमचं ट्वीट चर्चेत
त्यानंतर यामीने ‘चांद के पार चलो’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. तसंच ती ‘यह प्यार न होगा कम’ मध्ये ती गौरव खन्ना बरोबर दिसली. यामीचा अभिनय प्रेक्षकांना आवडला त्यानंतर यामी गौतमी घराघरात ओळखली जाऊ लागली. त्यानंतर तिने ‘विक्की डोनर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘उरी’, ‘काबिल’, ‘बाला’, ‘अ थर्सडे’ यासारख्या चित्रपटातही तिने काम केलं. IAS ऑफिसर व्हायचं स्वप्न बाळगणारी यामी आज एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.