यामी गौतम बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत तिने अनेक निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर यामी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. तीन वर्षांपूर्वी यामीने दिग्दर्शक आदित्य धरबरोबर लग्नगाठ बांधली. दरम्यान, यामीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून ती गरोदर असल्याची चर्चा सुरू आहे.
नुकतेच यामी व आदित्य मुंबईत एका ठिकाणी कामानिमित्त आले होते. त्यावेळी यामीच्या अंगावर गुलाबी रंगाचा ड्रेस होता; तर आदित्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर निळ्या रंगाचे नेहरू जॅकेट परिधान केले होते. या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते यामीच्या कृतीने. व्हिडीओमध्ये यामी ओढणीने आपले बेबी बंप लपवत असल्याची चर्चा सुरू आहे. यामीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट करीत तिला “तू, गरोदर आहेस का,” असा प्रश्नही विचारला आहे. तर काहींनी तिचे व आदित्यचे अभिनंदनही केले आहे.
यामी गौतम व आदित्य धरचा विवाहसोहळा ४ जून २०२१ रोजी पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील यामीच्या घरी हा लग्नसोहळा पार पडला होता. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी यामी व आदित्यने एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघे काही वर्षे एकमेकांना डेट करीत होते.
यामी गौतमच्या कामकाजाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘विकी डोनर’ चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्याबरोबर आयुष्मान खुरानाची प्रमुख भूमिका होती. गेल्या वर्षी तिचा ‘OMG 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी हे नामांकित अभिनेते असलेल्या या चित्रपटात तिने एका वकिलाची भूमिका साकारली होती. लवकरच यामी अभिनेत्री प्रिया मणीबरोबर ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.