दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी व यशराज फिल्म्सचा सर्वेसर्वा व निर्माता आदित्य चोप्राच्या आई पामेला चोप्रा यांचं निधन झालं आहे. राणी मुखर्जीच्या सासू पामेला चोप्रा यांचे आज २० एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. पामेला या एक प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका होत्या. त्या चित्रपट लेखिका आणि निर्मात्या देखील होत्या.

हेही वाचाअ‍ॅस्ट्रो मेंबर मूनबिनचं निधन, राहत्या घरात आढळला मृतदेह

Anna Beatriz Pereira Alves dies
ॲडल्ट चित्रपटाचं शूटिंग करताना घडली भयंकर घटना, हॉटेलच्या बाल्कनीतून कोसळून २७ वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
thane garbage collector sleeping on footpath killed by car
पदपथावर झोपलेल्या कचरा वेचकाच्या शरिरावरून मोटार गेल्याने मृत्यू
priyanka chopra in s s rajamouli movie
प्रियांका चोप्रा तब्बल ८ वर्षांनी करणार पुनरागमन, दाक्षिणात्य अभिनेत्यासह ‘या’ सिनेमात झळकणार, राजामौलींच्या पोस्टवरील कमेंटने वेधलं लक्ष
pimpri female patient dies due to guillain barre syndrome
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू
पिंपरी : कंटेनरच्या अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू
Oscars 2025 Nomination
Oscars 2025 Nomination : गुनीत मोंगा, प्रियांका चोप्रा यांना मोठं यश! ‘अनुजा’ला ऑस्कर २०२५ साठी मिळालं नामांकन
old woman died , teen Hat Naka area, Thane,
दूध आणण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, ठाण्याच्या तीन हात नाका भागातील घटना

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, पामेला चोप्रा यांच्या अंत्यसंस्काराबद्दल अद्याप कोणतीही माहिती चोप्रा कुटुंबाकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान, पामेला चोप्रा अखेरच्या यशराज फिल्म्सची डॉक्युमेंटरी ‘द रोमॅंटिक्स’मध्ये दिसल्या होत्या. त्यात त्यांनी त्यांचे दिवंगत पती यश चोप्रा आणि त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले होते. रोमँटिक्समध्ये यश चोप्रा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल भाष्य करण्यात आलं होतं. तसेच पामेला यांच्याही योगदानाचा उल्लेख होता.

Video: आकांक्षा दुबेचा आत्महत्येपूर्वीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; रडत म्हणाली, “मला काहीही झाल्यास…”

पामेला यांनी १९७० मध्ये यश चोप्रा यांच्याशी पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते. ते अरेंज मॅरेज होतं. त्यांना आदित्य आणि उदय चोप्रा ही दोन मुले आहेत. आदित्य हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. त्याने राणी मुखर्जीशी लग्न केले आहे. तर, उदय एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे.

Story img Loader