२०१० मध्ये आलेल्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून रणवीर सिंगने आपल्या अभिनयाच्या करिकीर्दीला सुरुवात केली. एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या रणवीर सिंगचे सध्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले. रणवीरचे ‘८३’, ‘जयेशभाई जोरदार’ आणि ‘सर्कस’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. याचा अभिनेत्याच्या आगामी कारकिर्दीवर चांगलाच परिणाम होणार आहे. सध्या यशराज फिल्म्स म्हणजेच YRF स्टुडिओ रणवीर सिंगबरोबर आता काम करणार नसल्याची चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीडिया रीपोर्टनुसार YRF ने सध्यातरी रणवीर सिंगबरोबर कोणताही चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे की, ‘YRF चे प्रमुख आदित्य चोप्रा आणि त्यांची मुख्य टीम सध्या YRF Spy Universe मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. त्यांनी अलीकडेच शाहरुख खानचा ‘पठाण’ हा एक जबरदस्त ब्लॉकबस्टर दिला आणि सलमान खानचा ‘टायगर ३’च्या प्रदर्शनासाठी ते तयारी करत आहेत.”

आणखी वाचा : गाण्यातील महिलांविषयी अपमानास्पद शब्दांबद्दल हनी सिंगचं स्पष्टीकरण; रॅपर म्हणतो, “असं असेल तर…”

सध्या याच ‘स्पाय युनिव्हर्स’च्या पुढील चित्रपटांवर पूर्णपणे मेहनत घेतली जात असल्याचंही स्पष्ट झालं आहे. YRF ला पुढे येणारे चित्रपट एकाग्र चित्ताने मेहनत घेऊन तयार करायचे आहेत. त्यामुळे यात रणवीर सिंगबरोबर एक चित्रपट करून तिथलं लक्ष विचलित करायचं नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हंटलं जात आहे.

याबरोबरच रणवीरने आजवर केवळ भन्साळी यांच्याबरोबरच केलेले चित्रपट सुपरहीट ठरल्याची चर्चा इंडस्ट्रीमध्ये होत आहे. या व्यतिरिक्त ‘सिंबा’ आणि ‘गली बॉय’ हे चित्रपट सोडल्यास रणवीर सिंगचे इतर चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत, शिवाय गेल्या काही दिवसांतील रणवीरची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी पाहता यश राज फिल्म्सनी घेतलेला हा निर्णय योग्यच असल्याचं बोललं जात आहे. YRF च्या या निर्णयामुळे रणवीरच्या करिकीर्दीला एक ब्रेक लागू शकतो अशी चिंतादेखील बरेच तज्ञ व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yash raj films studio decides not to work with ranveer singh for future projects avn
Show comments