माणसाच्या इतर गरजांप्रमाणेच मनोरंजनदेखील महत्त्वाची गरज मानली जाते. चित्रपट हे मनोरंजनाचे एक साधन म्हणून पाहिले जाते. विनोदी, भयपट, अ‍ॅक्शन, समांतर, रोमान्स, क्राइम, ड्रामा, सायन्स फिक्शन अशा विविध प्रकारांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते; तर काही चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवताना दिसतात. २०२४ या वर्षात अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. या वर्षात कोणते हिंदी चित्रपट टॉप ५ मध्ये आहेत, हे जाणून घेऊयात.

१. स्त्री २ (Stree 2) :

अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ ला प्रदर्शित झाला. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, तमन्ना भाटिया, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना हे कलाकार या चित्रपटात दिसले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत ८७४. ५८ कोटींची कमाई केली. या विनोदी भयपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडले आहेत. या चित्रपटाने शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाचा विक्रम मोडून सर्वाधिक कमाई केली आहे.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
vivek oberoi reveals why he rejected om shanti om film
विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”
legendary filmmaker shyam benegal
अग्रलेख: भारत भाष्य विधाता!
Year Ender 2024 Top 10 Bollywood Songs
Year Ender 2024 : विकी कौशलचं ‘तौबा-तौबा’ ते ‘सजनी’; वर्षभरात ‘या’ १० गाण्यांनी घातला धुमाकूळ, पाहा संपूर्ण यादी…
top 10 bockbuster movies 2024
Year Ender 2024 : ‘हे’ १० चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर, बॉक्स ऑफिसवरील कमाईसह प्रेक्षकांचीही मिळवली पसंती; वाचा यादी

२. शैतान (Shaitaan):

अजय देवगण व आर. माधवन या दोन लोकप्रिय अभिनेत्यांनी ‘शैतान’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. ८ मार्च २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाची कथा जादूटोणा, गूढता यांवर आधारित आहे. आर. माधवनने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २११.०६ कोटींची कमाई केली केली आहे. शैतानमध्ये अजय देवगण व आर. माधवन यांच्याबरोबर अभिनेत्री ज्योतिकादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे.

३. फायटर (Fighter) :

हृतिक रोशन व दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘फायटर’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित झाला. सिद्धार्थ आनंद यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, लोकप्रिय अभिनेते अनिल कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. हा चित्रपट या वर्षातील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक ठरला.

४. भूल भुलैया ३ (Bhool Bhulaiyaa 3):

‘भूल भुलैया’च्या पहिल्या दोन धमाकेदार भागानंतर या चित्रपटाचा तिसरा भाग १ नोव्हेंबर २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित व विद्या बालन यांच्याबरोबर तृप्ती डिमरीदेखील अभिनय करताना दिसली. राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा, मनीष वाधवा, रोज सरदाना, कांचन मलिक आणि इतर कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले असून, भूषण कुमार, कृष्ण कुमार व मुराद खेतानी हे ‘भूल भुलैया’चे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४१७.५१ कोटींची कमाई केली.

५. किल (Kill)

निखिल नागेश भट दिग्दर्शित किल चित्रपट ५ जुलै २०२४ ला प्रदर्शित झाला. राघव जुयाल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला आहे. २०२४ मध्ये हा थ्रिलर चित्रपट लोकप्रिय ठरला आहे.

हेही वाचा: Video: “त्या रस्त्यावर बसलेल्या नाहीत…”, प्राजक्ता माळीबाबतच्या विधानावरून मेघा धाडे संतापली; म्हणाली, “तू घाबरून जाऊ नकोस”

आयएमडीबी (IMDb)च्या यादीनुसार हे २०२४ मधील हे टॉप ५ हिंदी चित्रपट आहेत. या चित्रपटांबरोबर ‘सिंघम अगेन’, ‘लापता लेडीज’ या चित्रपटांनादेखील प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसले. ‘कल्की :२८९८ एडी’, ‘महाराजा’, ‘मंजुमेल बॉयज’ या इतर भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. तर ‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ ही २०२४ मधील सर्वांत लोकप्रिय भारतीय वेब सीरिज ठरली.

Story img Loader