Year Ender Top Bollywood Stars Of 2024 : २०२४ या वर्षात प्रेक्षकांना बॉलीवूडमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. काही चित्रपट तुफान गाजले, तर काही चित्रपटांवर फ्लॉपच्या पाट्या लागल्या. अनेक कलाकारांचे सिनेमे सुपरहिट ठरले, तर यावर्षी स्टारकिड्सच्या पलीकडे जाऊन बॉलीवूडमध्ये काही नवोदित चेहऱ्यांची देखील ओळख निर्माण झाली. IMDb ने २०२४ मध्ये सर्वाधिक चर्चेत आणि प्रसिद्धीझोतात राहिलेल्या भारतीय कलाकारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये टॉप-१० च्या यादीत कोणाला कितवं स्थान मिळालंय, जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

IMDb ही संस्था जगभरातील २५ कोटींहून ( दरमहा ) अधिक दर्शकांच्या आधारे ही क्रमवारी ठरवते. २०२४ या वर्षात आलिया भट्ट, दीपिका पादुकोण या टॉपच्या अभिनेत्रींना मागे काढत तृप्ती डिमरी सर्वाधिक चर्चेत राहिल्याचं समोर आलं आहे. यंदा ‘बॅड न्यूज’, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’, ‘भुल भुलैया ३’ या तीन सिनेमांमध्ये तिने मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा : “महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”

IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया याबद्दल म्हणतात, “२०२४ ची सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची यादी पाहिल्यास यामध्ये भविष्यातील प्रतिभावान कलाकारांचा समावेश असल्याचं स्पष्ट होतं. याशिवाय भारतीय मनोरंजन विश्वात किती वैविध्यपूर्णता आहे याचीही प्रचिती येते. यंदाच्या यादीत शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसह तृप्ती डिमरी आणि शर्वरीसारख्या नवोदित अभिनेत्री असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. भारतीय चित्रपट व आपल्या कलाकारांना मिळणारी आंतरराष्ट्रीय मान्यता दिवसेंदिवस कशी वाढत आहे, हे सुद्धा या वर्षीच्या टॉप-१० कलाकारांच्या यादीमधून स्पष्ट होत आहे.”

तृप्ती आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानत म्हणाली, “२०२४ च्या IMDb सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. माझ्या चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं आहे. या वर्षामध्ये मी अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलेलं आहे. आता भविष्यात मी प्रेक्षकांचं आणखी मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन”

IMDb चे टॉप १० सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकार

१. तृप्ती डिमरी
२. दीपिका पादुकोण
३. इशान खट्टर
४. शाहरुख खान
५. सोभिता धुलिपाला
६. शर्वरी वाघ
७. ऐश्वर्या राय बच्चन
८. समांथा
९. आलिया भट्ट
१०. प्रभास

दरम्यान, दीपिका यंदा ‘फायटर’, ‘कल्की 2898 एडी’, आणि ‘सिंघम अगेन’ या चित्रपटांमध्ये झळकली. तेलुगू सिनेविश्वातील पदार्पणामुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आणि अभिनेत्रीने या यादीत दुसरा क्रमांक पटकावला. तर, इशान खट्टरने दोन आंतरराष्ट्रीय टीव्ही मालिकांद्वारे आपल्या चाहत्यांची संख्या आणखी वाढवली. ‘द परफेक्ट कपल’मध्ये त्याने निकोल किडमन, लिएव्ह श्राईबर आणि ईव्ह ह्यूसनसह काम केलं आहे. शाहरुख खान देखील त्याच्या बॉलीवूड पुनरागमनापासून सतत चर्चेत असतो.

पाचव्या स्थानी असलेल्या सोभिता धुलीपालाने यावर्षी ‘मंकी मॅन’ चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तसेच नागा चैतन्य अक्कीनेनीबरोबर साखरपुडा झाल्यावर ती चर्चेत आली होती. ‘मुंज्या’, ‘महाराज’, ‘वेदा’ या तीन चित्रपटांमुळे शर्वरीने ( सहावं स्थान ) प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ऐश्वर्या राय बच्चन व समांथा या दोन अभिनेत्री या यादीत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत.

Year Ender Top Bollywood Stars Of 2024

तर, नवव्या स्थानावर असलेल्या आलियाने IMDb च्या यादीत सलग तिसऱ्या वर्षी टॉप-१० मध्ये स्थान मिळवलं आहे. २०२४ मध्ये तिने पॅरीस फॅशन वीकमध्ये पदार्पण केलं होतं. शिवाय यावर्षी तिचा ‘जिगरा’, हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. याची निर्मिती सुद्धा तिने केली होती. याशिवाय दहावं स्थान ‘बाहुबली’ प्रभासला मिळालं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Year ender top 10 bollywood stars of 2024 here is the list of celebrities sva 00