प्रसिद्ध रॅपर हनी सिंगने ( Honey Singh ) आपल्या दमदार आवाजाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्याचा प्रत्येक रॅप, गाणं सुपरहिट होतं असतं. हनी सिंग त्याच्या रॅप, गाण्यांमुळे जितका चर्चेत असतो. तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या हनी सिंगचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये हनी सिंग मराठीत संवाद साधताना दिसत आहे. एवढंच नाहीतर त्याने दादा कोंडकेंच्या लोकप्रिय गाण्यांचा दोन ओळी गायल्या आहेत. हनी सिंगचा या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

काही दिवसांपूर्वी हनी सिंगचा पुण्यात कॉन्सर्ट झाला होता. या कॉन्सर्टला बऱ्याच मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता किरण गायकवाडने हनी सिंगच्या कॉन्सर्टमधील फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. याच कॉन्सर्टमध्ये हनी सिंगने मराठीत उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधला. हे ऐकताच सर्व श्रोते जोरजोरात ओरडू लागले होते. हनी सिंगचा व्हायरल व्हिडीओ सानिका वेंगुर्लेकरच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये हनी सिंग मराठीत श्रोत्यांशी संवाद साधताना म्हणतो, “कसा आहेस?….ये फोटो काढणारे…तुझ्या आईला मी सांगतो.” हनी सिंग मराठीत बोलताच श्रोते जोरजोरात ओरडताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर हनी सिंग दादा कोंडकेंचं लोकप्रिय गाणं ‘ढगाला लागली कळ’ गाण्यांच्या दोन गाताना दिसत आहे.

पुढे हनी सिंग म्हणतो की, मला प्रत्येक भाषा माहीत आहे. कारण माझं भारतवर प्रेम आहे. म्हणून मी एवढं प्रेम घेऊन आलो आहे, असं सांगत तो शर्टवरील हार्ट दाखवतो. हनी सिंगचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. २ मिलियनहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. “हनी दादाला माझ्या तर्फे एक प्लेट बेडेकर मिसळ”, “हनी शिंदे”, “पुण्यात येऊन मराठी नाही बोला तर काय बोला”, “हण्या भावाला माझ्याकडून कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा”, “हनी कोंडके”, अशा मजेशीर प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “आपला मराठी माणूस यो यो हनी सिंग”. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “पुण्यामध्ये मराठीत बोलावं लागतं.”

दरम्यान, हनी सिंगच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने इंडस्ट्री आपल्या गाण्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी हनी सिंग डिप्रेशनमध्ये होता. पण ‘ब्राउन रंग’, ‘लक २८ कुडी दा’, ‘मैं शराबी’ या गाण्यांनी तो प्रसिद्ध झोतात आला. त्याचा भारतातच नाहीतर जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. हनी सिंगची एकूण संपत्ती २०५ कोटी आहे. मुंबईत त्याचं आलिशान घर आहे. याशिवाय गुरुग्राममध्ये हनी सिंगची संपत्ती आहे. त्याला आलिशान गाड्यांची खूप आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे मोठ्या ब्रँडेड गाड्या आहेत. अलीकडेच त्याचं ‘दिदिया के देवरा’ गाणं सुपरहिट झालं होतं.