युवराज सिंगचे वडील योगराज सिंग (Yograj Singh) अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करत असतात. युवराज सिंगच्या कारकि‍र्दीबाबत धोनीला जबाबदार धरत ते त्यावर टीका करत असतात तर इतर अनेक विषयावर वादग्रस्त वक्तव्य करत असतात. आता त्यांनी अभिनेता आमिर खानच्या समीक्षकांनी कौतुक केलेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटावर वादग्रस्त विधान केले आहे.

‘अनफिल्टर्ड बाय समदीश’ या यूट्यूब चॅनलवरील समदीश भाटियाला दिलेल्या एका मुलाखतीत योगराज यांनी ‘तारे जमीन पर’ हा ‘अतिशय फालतू’ सिनेमा आहे असे म्हटले आहे. त्यांनी या मुलाखतीत पालकत्व आणि मुलांच्या संगोपनावर त्यांचा दृष्टिकोन मांडला.

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
zara dar pornhub video income
Zara Dar: PhD सोडून पॉर्नहब निवडलं; आता अभ्यासाचे व्हिडीओ टाकून कमावते अधिक पैसे; कोण आहे जारा डार?
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली

हेही वाचा…रामचरणच्या ‘गेम चेंजर’ सिनेमाची आकडेवारी खोटी? प्रसिद्ध दिग्दर्शकाने उपस्थित केली शंका, पोस्ट करत म्हणाले…

योगराज सिंग यांनी या मुलाखतीत सांगितले की, मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर त्याच्या वडिलांचा प्रभाव सर्वाधिक असतो. ते म्हणाले, “मुलांच्या वडिलांना त्यांनी जे व्हावे असं वाटतं तेच मुलं बनतात” ही चर्चा ‘तारे जमीन पर’ सिनेमाकडे वळताच, योगराज यांनी या चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “हा खूपच फालतू चित्रपट आहे,” (बडी ही वाहियात फिल्म है) तसेच, “मी असे चित्रपट बघत नाही”, असे सांगत ते अशा प्रकारचे चित्रपट पाहत नसल्याचे स्पष्ट केले.

योगराज सिंह यांनी हिंदी चित्रपटांविषयी त्यांचे विचार व्यक्त करताना सांगितले, “हिंदी फिल्म बघण्यासारखी असते का? मला भारतीय अभिनेते आवडत नाहीत (हिंदी चित्रपट पाहण्यासारखे नाहीत).” त्यांनी भारतीय अभिनेत्यांविषयी त्यांचा तिटकारा व्यक्त केला आणि रणवीर सिंग, रणबीर कपूर यांसारख्या स्टार्ससह ‘बाहुबली’सारख्या लोकप्रिय चित्रपटांनाही फेटाळले. ते म्हणाले, “हे सगळं बेकार आहे. काय बाहुबली? सोडून द्या.”

हेही वाचा…श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

याउलट, त्यांनी हॉलिवूडच्या चित्रपटांचे कौतुक केले, ज्यामध्ये ‘बेन हूर’ आणि ‘द गॉडफादर’ यांचा उल्लेख केला. तसेच, त्यांना पंजाबी क्राइम थ्रिलर ‘कोहरा’ची विशेष आवड असल्याचेही त्यांनी मान्य केले.

योगराज सिंग यांनी ज्या ‘तारे जमीन पर’ वर टीका केली तो सिनेमा २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. आमिर खानने दिग्दर्शित केलेला या चित्रपटाची कथा आठ वर्षांच्या ईशान अवस्थी नावाच्या मुलाभोवती फिरते, तो ‘डिस्लेक्सिया’ आजाराने त्रस्त असतो. यामुळे त्याला लिहिताना आणि वाचताना अडचण येते. या चित्रपटात ईशानला त्याचा कला शिक्षक (आमिर खान) या आजारातून बाहेर येण्यास मदत करतो, त्याच्या अडचणींवर मात करण्यास आणि त्याच्या वेगळेपणाला आत्मसात करण्यास प्रवृत्त करतो. ‘डिस्लेक्सिया’ आजारामुळे शिकताना येणाऱ्या अडचणी आणि मुलांच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांना जपण्याच्या संदेशासाठी या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते.

हेही वाचा…बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”

अलीकडेच ‘तारे जमीन पर’ चित्रपटाच्या १७ व्या वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, ईशानच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री टिस्का चोप्राने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली होती. या व्हिडीओत ती दर्शील सफारी (ईशानची भूमिका करणारा अभिनेता) याच्याबरोबरचा या चित्रपटातील एक क्षण विनोदी पद्धतीने पुन्हा उभा करते. ती दोन चिठ्ठ्या धरून ठेवते—एका चिठ्ठीवर घरी तयार केलेले जेवण आणि दुसऱ्यावर जंक फूडच्या पर्यायांची यादी असते. दर्शील जंक फूडची चिठ्ठी निवडतो, पण शेवटी दाळ भात आणि भाजी खातो.

Story img Loader