नुकतंच ‘फर्जी’ या वेब सीरिजमधून डिजिटल विश्वात पदार्पण करणारा शाहीद कपूर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता एका व्हायरल व्हिडिओमुळे शाहीद पुन्हा चर्चेत आला आहे. शाहीद कपूरचा नुकताच समोर आलेल्या व्हिडिओने त्याच्या लूकपेक्षा चाहत्याच्या कृतीने लक्ष वेधून घेतले आहे. इतकंच नव्हे तर हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी शाहीदलाही खडेबोल सूनवायला कमी केलेली नाही.
शाहीद कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये अभिनेत्याची एक तरुण चाहती त्याला भेटण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहे. प्रथम तिने शाहीदबरोबर सेल्फी काढला आणि त्यानंतर तिने जे केले ते पाहून बरीच लोक आश्चर्यचकित झाले.
आणखी वाचा : सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा अडचणीत; ‘या’ कारणासाठी मिळाली कायदेशीर नोटिस
या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम त्या मुलीने शाहीदबरोबर सेल्फी घेतला, अन् नंतर त्याला पाहून ती इतकी आनंदी झाली की तिने तिथेच शाहीद कारमध्ये बसण्याआधी त्याला वाकून नमस्कार केला. या तरुण चाहतीच्या या कृतीमुळे बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या. ती जेव्हा नमस्कार करत होती तेव्हा शाहिद आपसूकच मागे झाला पण तिच्या या कृतीमुळे लोकांनी सोशल मीडियावर याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
शाहिद कपूरच्या या व्हिडिओवर बऱ्याच लोकांनी कॉमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, “वाकून नमस्कार करायची काय गरज आहे… तो आवडता अभिनेता आहे, देव नाही. प्रेम आणि आदर दाखवण्याचे इतर मार्गही आहेत!” दुसर्याने लिहिले आहे की, ‘ती शाहिद कपूर देव असल्याप्रमाणे वागत आहे.’ आणखी एका नेटकऱ्याने कॉमेंट करत लिहिलं, “तुला पाया पडायचं असेल तर आई-वडिलांच्या पाया पड. या लोकांना विनाकारण डोक्यावर घेण्याची आवश्यकता नाही.”
शाहीद कपूर नुकताच ‘फर्जी’ या वेबसीरिजमधून झळकला. यातील शाहिदच्या कामाची खूप प्रशंसा झाली. आता शाहीद अली अब्बास जफरच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटात अॅक्शन अवतारात दिसणार आहे. हा चित्रपट २०११ च्या फ्रेंच चित्रपट ‘निट ब्लैंच’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. याबरोबरच शाहीद कपूर क्रीती सनॉन यांचा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.