रणवीर सिंग हा भारतीय चित्रपटविश्वातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गोलियों की रासलीला राम लीला’, ‘सिम्बा’ यासारख्या कित्येक चित्रपटात आपल्या लाजवाब अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची छाप सोडली आहे. दुर्दैवाने, त्याचे गेल्या काही दिवसातील चित्रपट जसे की ‘सर्कस’, ‘जयेशभाई जोरदार’, आणि ‘८३’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत. याबरोबरच यश राज फिल्म आणि आदित्य चोप्रा यांनीसुद्धा रणवीरबरोबर चित्रपट न करायचा निर्णय घेतल्याची चर्चा होत आहे.

अशातच रणवीर सिंग आता लवकरच भन्साळी यांच्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याची चर्चा होत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ या प्रोजेक्टमधून रणवीर सिंग पुन्हा कामबॅक करणार असल्याचं म्हंटलं जात आहे. शिवाय यश राज आणि आदित्य चोप्राने रणवीर सिंगची साथ सोडल्याची बातमीसुद्धा बऱ्याच खात्रीशीर सूत्रांनी खोडून काढली आहे.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…

आणखी वाचा : महिमा चौधरीला कर्करोगातून बरं होण्यासाठी कपिल शर्माने केलेली मदत; अभिनेत्री आभार मानत म्हणाली…

‘इटाईम्स’ला आदित्य चोप्राच्या खात्रीशीर सूत्रांनी सांगितल्यानुसार “कोण म्हणतं आदित्य आणि यशराजला रणवीरबरोबर काम करायचं नाही? चढ-उतार हे या उद्योगातील येतच असतात त्यामुळे असे व्यावसायिक संबंध खराब होत नसतात. राजेश खन्ना यांनी सलग नऊ फ्लॉप चित्रपट दिले होते पण यश चोप्रा यांच्या ‘दाग’मधून त्यांनी जबरदस्त कमबॅक केले. रणवीरही भन्साळींच्या ‘बैजू बावरा’मधून धमाकेदार कमबॅक करेल. रणवीरच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरेल.”

आणखी वाचा : “त्यांना आरसा दाखवायला हवा…” बॉलिवूड स्टार्सच्या अव्वाच्या सव्वा मानधनावर समीक्षक तरण आदर्श स्पष्टच बोलले

भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’मध्ये रणवीरसह आलिया भट्टही दिसणार असल्याची चर्चा होत आहे. या दोघांची जोडी ‘गली बॉय’मध्ये लोकांच्या पसंतीस उतरली होती. अर्थात याबद्दल अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहेत. यात जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader