Sonaskhi Sinha-Zaheer Iqbal : सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी २३ जून २०२४ रोजी लग्न केलं. दोघांनी नोंदणी पद्धतीने सोनाक्षीच्या घरी लग्नगाठ बांधली. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला तिचे आई-वडील, झहीरचे पालक व त्याची भावंड आणि काही जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. सोनाक्षी व झहीर यांनी लग्नानंतर पहिली मुलाखत दिली आहे. यामध्ये दोघांनी लग्नाबद्दल माहिती शेअर केली आहे.

‘गॅलाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत झहीर इक्बाल व सोनाक्षी यांच्यासाठी एक सरप्राईज ऑडिओ क्लिप दाखवण्यात आली. या ऑडिओ क्लिपमध्ये झहीरच्या आईने मुलगा व सूनेसाठी खास मेसेज पाठवला होता. आपल्या लाडक्या सूनेबद्दल भावना व्यक्त करत झहीरचे आई- वडील म्हणाले, “तू आमची सून आहेस हे आमचं भाग्य आहे. तुला आणि झहीरला एकत्र पाहून आनंदी पाहून वाटतं की तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनले आहात. तुझं मन खरंच सोन्यासारखं (असली सोना) आहे. तू आम्हाला इतके आदर व प्रेम दिले आहेस की झहीरला तुझ्यापेक्षा आणखी चांगली मुलगी भेटूच शकली नसती. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद, लव्ह यू, काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा.”

“अंबानींच्या लग्नावर टीका करणारे तुम्ही कोण?” पाकिस्तानींना त्यांच्याच अभिनेत्याने सुनावलं; म्हणाला, “त्यांच्या पैशांवर…”

वहिनी सोनाक्षीसाठी नणंदेचा खास मेसेज

याच मुलाखतीत झहीरची बहीण सनम रतनसीनेही वहिनी सोनाक्षीसाठी खास मेसेज पाठवला. “मला अजूनही आठवतंय जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटले. आर्या काही महिन्यांची होती आणि झहीरने मला फोन करून विचारलं की तो त्याच्या एका मैत्रिणीला घरी आणू शकतो का? त्यावेळी माझ्या भावाने तुम्ही दोघेही फक्त चांगले मित्र आहात हे पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मी खूप खुश आहे की तुम्ही दोघे भेटलात आणि प्रेमात पडलात. आम्हा सर्वांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे,” असं सनम रतनसी म्हणाली.

Sonakshi Sinha Zaheer Iqbal
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल

Bigg Boss OTT 3: कृतिका-अरमान मलिकला अटक करा; आमदार मनिषा कायंदेंची मागणी, म्हणाल्या, “शोमध्ये अश्लीलता…”

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी वांद्रे येथे नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्याच दिवशी बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये बॉलीवूमधील मित्र-मैत्रिणींसाठी जंगी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. सोनाक्षी व झहीर यांचं आंतरधर्मीय लग्न असल्याने दोघांवर खूप टीकाही झाली होती, पण त्यांनी मात्र या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष केलं आणि लग्न एंजॉय केलं. सोनाक्षी व झहीर लग्नातील खास क्षणांचे अनेक अनसीन फोटो व व्हिडीओ आताही शेअर करत आहेत.