‘दंगल’ फेम अभिनेत्रा झायरा वसीमने चार वर्षांपूर्वी इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडली. इंडस्ट्री सोडल्यानंतरही ती सोशल मीडियावर सक्रिय असून तिची मतं ती मांडत असते. सध्या झायरा तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. यात तिने नकाब घालून जेवणाऱ्या एका महिलेचा फोटो ट्वीट करत तिचं मत व्यक्त केलं आहे.
रणदीप हुड्डाने वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी कमी केलं तब्बल २६ किलो वजन; फक्त ग्लासभर दूध अन्…
कोणीतरी ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये एक मुस्लीम महिला नकाबमध्ये आहे आणि ती जेवतानाही चेहऱ्यावरून तो हटवत नाहीये. हा फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीने ‘ही तिची चॉइस आहे का?’ असा प्रश्न विचारला होता. यावर झायरा वसीमने उत्तर दिलंय. हा फोटो रिट्विट करत तिने लिहिलं, “मी नुकतेच एका लग्नाला गेले होते. मीही अशाच पद्धतीने नकाबमध्ये जेवले. ती माझी स्वतःची चॉइस होती. माझ्या सभोवतालच्या सर्वांना मी नकाब हटवेन, अशी अपेक्षा होती. पण, मी तसं केलं नाही. आम्ही हे तुमच्यासाठी करत नाही, त्यामुळे त्याला सामोरे जा.”
दरम्यान, काहींनी झायराच्या या ट्वीटनंतर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर, काहींनी मात्र तिच्यावर टीका केली आहे.
कर्नाटकमधील हिजाब बंदीवर झायराने केलेलं भाष्य
“वारशात मिळालेला हिजाब ही निवड नाही. ही एक प्रकारची कल्पना आहे जी सोयीनुसार तयार केली गेलीय. इस्लाममध्ये हिजाब हा पर्याय नसून एक बंधन आहे. हिजाब परिधान करणारी एक स्त्री देवाने दिलेलं एक कर्तव्य पूर्ण करत आहे. ज्या देवावर ती प्रेम करते आणि ज्याच्यासमोर ती स्वतःला सादर करते. मी देखील हिजाब सन्मानाने आणि आदराने परिधान करतो. मुस्लिम महिलांसोबत भेदभाव करणे, त्यांना शिक्षण आणि हिजाब यापैकी एक निवडायला लावणे आणि एक सोडायला लावणे हे अन्यायकारक आहे,” असं झायराने कर्नाटकमध्ये शाळेतील हिजाब बंदीवर भाष्य करताना म्हटलं होतं.