सारा अली खान आणि विकी कौशल सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. विकी-साराचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाची कथा इंदूरमधील मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित आहे. अलीकडेच चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या कास्टिंगबाबत भाष्य केले आहे. तसेच या चित्रपटात सारा अली खानने साकारलेल्या ‘सौम्या’च्या रोलसाठी कतरिनाची निवड का केली नाही याबाबतही दिग्दर्शकांनी खुलासा केला आहे.
हेही वाचा : रणबीर-दीपिकाच्या ‘ये जवानी है दीवानी’ला १० वर्षं पूर्ण; चाहते म्हणतात, “फक्त एक गिफ्ट द्या चित्रपट पुन्हा…”
दिग्दर्शत लक्ष्मण उतेकर म्हणाले, “कतरिना कैफ एका छोट्या शहरातील मध्यमवर्गीय गृहिणीच्या भूमिकेत फिट बसेल याचा मी विचारही करू शकत नाही…तिचे व्यक्तिमत्त्व आधीपासून वेगळे आहे, ती आपल्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीत लहानाची मोठी झाली आहे यात तिची काहीही चूक नाही. या भूमिकेसाठी नायिकेमध्ये एक देसी टच हवा होता तो साराच्या रुपाने आम्हाला मिळाला, परंतु भविष्यात जर तशी स्क्रिप्ट असेल तर मी नक्की विकी-कतरिनाबरोबर एखादा चित्रपट करेन.”
दरम्यान, ‘जरा हटके जरा बचके’चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी-साराने आयपीएल २०२३ च्या शेवटच्या सामन्याला हजेरी लावली होती. या वेळी विकी-साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातील “फिर और क्या चाहिए…” हे गाणे स्टेडियममध्ये वाजवण्यात आले. हा चित्रपट २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटात विकी-साराबरोबर राकेश बेदी, शारिब हाश्मी, नीरज सूद यांसारखे अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.