विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच वीकेंडला या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून चित्रपटाने तीन दिवसांत २२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘जरा हटके जरा बचके’मध्ये इंदूरमधील मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली असून हा चित्रपट सामाजिक समस्येवर बेतलेला आहे.

हेही वाचा : Shark Tank India: प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार ‘शार्क टॅंक इंडिया’चा तिसरा सीझन; कसे आणि कुठे कराल रजिस्ट्रेशन? जाणून घ्या

चित्रपटाला प्रेक्षकांची मिळणारी पसंती पाहून अभिनेता विकी कौशलने खास पोस्ट शेअर केली आहे. विकी लिहितो, “खूप वर्षांनी तुमच्या शहरात, बाजारात, कॉलेजमध्ये, घरी येऊन तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. गेले दोन आठवडे झोप नाही मिळाली पण, समाधान जरूर मिळाले. प्रेक्षकहो! तुमचे खूप खूप आभार! तुम्ही आमच्या टीमला खूप प्रोत्साहन दिले. ‘जरा हटके जरा बचके’ आता आपल्या सर्वांचा चित्रपट आहे. सहपरिवार या चित्रपटाचा आनंद घ्या…”

हेही वाचा : ‘जब वी मेट’ पाहिल्यावर काय होती शाहिद कपूरच्या मुलांची प्रतिक्रिया? अभिनेत्याने सांगितले, “दोघेही उत्सुक होते, पण…”

विकी कौशल आणि सारा अली खान यांनी रविवारी रात्री चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या वेळी एका व्यक्तीने गर्दीत मधोमध उभे राहत एवढा उत्तम चित्रपट बनवल्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार मानले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून विकी आणि साराने सुद्धा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : “छोटा भाई है मेरा”, सारा अली खानचे भावावर आहे जीवापाड प्रेम; दोघांचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले

‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाने तीन दिवसांत २२ कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ५.४९ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी ७.२०, तर तिसऱ्या दिवशी ९.९० कोटींचा गल्ला जमवत आता चित्रपटाचे एकूण कलेक्शन २२.५९ कोटींवर पोहोचले आहे.