Zareen Khan Break Up: सलमान खानच्या ‘वीर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खान सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. झरीन खानचे ब्रेकअप झाले आहे. तिच्या एका मित्राने तिचं ब्रेकअप झालं आहे, अशी माहिती दिली. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर झरीन व तिचा बॉयफ्रेंड वेगळे झाले.
अभिनेत्री झरीन खान बिग बॉस फेम शिवाशिष मिश्राला डेट करत होती, पण त्यांचे ब्रेकअप झाले आहे. या दोघांच्या एका जवळच्या मित्राने ब्रेकअपची पुष्टी केली. “काही महिन्यांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले. त्यांच्या ब्रेकअपला काही गोष्टी कारणीभूत ठरल्या. दोघेही फार वेगळ्या वातावरणात मोठे झाले आहेत, त्यामुळे त्यांनी मिळून नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला,” असं त्यांच्या मित्राने सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दल वृत्त दिलं आहे.
वडिलांचा तो सल्ला अन् ‘मिर्झापूर ३’मधील इंटिमेट सीन; ‘सलोनी भाभी’ म्हणाली, “मला वाटलं की हे…”
या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारी-मार्चमध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. झरीन व शिवाशिष यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोही केले आहे. शिवाशिषने झरीनबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते, त्यापैकी फोटो अजुनही आहेत.

शिवाशिषबरोबरच्या नात्याबद्दल काय म्हणाली झरीन खान?
दरम्यान, झरीन व शिवाशिष यांनी २०२१ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. २०२१ मध्ये झरीनने तिच्या नात्याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. “आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही दोघेही सारखेच आहोत आणि आम्हाला एकमेकांबरोबर वेळ घालवायला आवडतं. हे नातं पुढे कुठपर्यंत जाईल ते पाहू. आम्ही दोघे या वर्षाच्या सुरुवातीला भेटलो. आम्ही चांगले मित्र आहोत,” असं झरीन मुलाखतीत म्हणाली होती.
लग्न करायचं नाही – झरीन खान
काही दिवसांपूर्वी झरीन खानने भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या होत्या. यावेळी तिला लग्नाची कल्पना फारशी मान्य नसल्याचं तिने सांगितलं. भारतीने झरीनला विचारलं की तिला लग्नाचे प्रस्ताव आले आहेत का? ती उत्तर देत म्हणाली, “समोरासमोर येऊन मला कोणीच लग्नासाठी विचारलेलं नाही. कुणी प्रयत्न करत असेल तर मला कल्पना नाही. पण मला लग्न करायचं नाही. मला कधीच लग्न करायचं नाही. आजकाल लग्नाच्या बाबतीत जे घडतंय ना, लग्न केलं तीन महिन्यात घटस्फोट झाला ते फार विचित्र आहे. ज्या प्रमाणे एकदा स्वाइप करून जेवण ऑर्डर केलं जातं, अगदी तसंच लोकांच्या बाबतीत घडत आहे. हे जग खूप विचित्र आहे.”