बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिकांमुळे, कधी त्यांनी शेअर केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी त्यांनी मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेत्री झरीन खानने कतरिना कैफबरोबर तुलना झाल्याने तिचे करिअर उद्ध्वस्त झाल्याचे वक्तव्य केले आहे.

झरीन खान काय म्हणाली?

प्रसिद्ध कॉमेडियन भारती आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये झरीन खानने हजेरी लावली होती. यामध्ये तिने आपल्या करिअरबद्दल वक्तव्य केले आहे. ‘वीर’ चित्रपटानंतर तिचा करिअरचा अनुभव कसा होता हे सांगताना ती म्हणते, “‘वीर’ चित्रपटानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. तो चित्रपट खूप मोठा होता आणि आतासुद्धा माझ्यासाठी माझे आयुष्य बदलणारा चित्रपट आहे. त्या चित्रपटानंतर मला वाईट अनुभव आले आहेत. माझी तुलना कतरिना कैफबरोबर केली जात होती. सुरुवातीला मला छान वाटले, कारण कतरिना खूप सुंदर आहे. पण, मला वाटते की ही गोष्ट इंडस्ट्रीमध्ये चुकीच्या पद्धतीने पसरली. माझ्यासाठी कतरिनाबरोबर तुलना होणे ही गोष्ट खूप मोठी होती, पण ती वाईट ठरली. या इंडस्ट्रीमधल्या अनेक लोकांना मी ओळखत नाही. अनेक दिग्दर्शक आणि निर्माते यांना फक्त मी त्यांच्या नावाने ओळखते. पण, सलमान खानने मला चित्रपटात आणले आहे म्हणून मी गर्विष्ठ आहे, असा अनेकांचा समज झाला.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

हेही वाचा: “तोंडावर लाली पावडर नाही केली तर भयानक…”, म्हणणाऱ्या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं, म्हणाल्या…

झरीन खान पुढे बोलताना म्हणते की, माझ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात टीका होत होती की एक वेळ अशी आली, मला घराबाहेर पडणे अशक्य होऊ लागले. लोक माझ्या कपड्यांवर कंमेट करू लागले. माझे वजन जास्त आहे, असेही म्हटले गेले. मी काय करणार होते? मला अनेक नावे दिली गेली. त्यामुळे मला घरात बसून राहणे जास्त सोयीस्कर वाटू लागले. कतरिनासोबत केलेली तुलना माझ्यासाठी वाईट ठरली.

झरीन खानने सलमान खानच्या २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीर’ चित्रपटातून मुख्य भूमिकेतून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘वीर’ चित्रपटानंतर ‘कॅरक्टर ढीला’ या गाण्यातून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. याबरोबरच, ‘हाऊसफुल २’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले. याशिवाय, झरीनने ‘हेट स्टोरी ३’, ‘अक्सर २’, ‘१९२१’ अशा अनेक चित्रपटांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

Story img Loader