Zee Cine Awards 2024 : हॉलीवूडमध्ये सध्या ९६ व्या अकादमी पुरस्कारांची म्हणजेच ‘ऑस्कर २०२४’ची चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे भारतात ‘झी सिने अवॉर्ड्स’च्या रेड कार्पेटवर संपूर्ण बॉलीवूड कलाविश्व एकत्र अवतरल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी हा सोहळा पार पडला. यावेळी मनोरंजन विश्वात दमदार कामगिरी करणाऱ्या सेलिब्रिटींचा सन्मान करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी सिने अवॉर्ड्स’मध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी, अनन्या पांडे, आलिया भट्ट, बॉबी देओल असे दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. २०२३ मध्ये शाहरुखने तब्बल ४ वर्षांनी बॉक्स ऑफिसवर कमबॅक केल्याने या सोहळ्यात पुरस्कार मिळवण्यासाठी अभिनेत्याचे एकूण तीन चित्रपट शर्यतीत होते. ‘झी सिने अवॉर्ड्स’मध्ये किंग खानच्या ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’ चित्रपटांमध्ये सर्वाधिक यश ‘जवान’ला मिळालं.

हेही वाचा : Oscar 2024 : …अन् जॉन सीना नग्नावस्थेत पोहोचला ऑस्करच्या मंचावर, पाहा व्हिडीओ

शाहरुखसह राणी मुखर्जी, कार्तिक आर्यन, बॉबी देओल, आलिया भट्ट, कियारा अडवाणी यांनी देखील काही पुरस्कारांवर नाव कोरलं. ‘झी सिने अवॉर्ड्स’मध्ये यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान ठरला आहे. तर, ‘जवान’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट, व्हीएफएक्स, सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन असे पुरस्कार मिळवले आहेत.

हेही वाचा : Video : शाहरुख-माधुरीच्या लोकप्रिय गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स; मराठी कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव

दक्षिणेतील लोकप्रिय संगीत दिग्दर्शक अनिरुद्धला ‘जवान’ चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट BGM’ हा पुरस्कार मिळाला. याशिवाय शिल्पा रावला ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण ‘झी टीव्ही वाहिनी’वर १६ मार्चला सायंकाळी करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee cine awards 2024 winners shah rukh khan wins best actor and jawan won best film awards sva 00