ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्या इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहेत व त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर करत असतात. व्यावसायिक आयुष्यात प्रचंड यश मिळालं, मात्र झीनत यांचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले राहिले. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना झीनत यांनी १९८५ मध्ये अभिनेता मजहर खानशी लग्न केलं होतं. मात्र या लग्नात झीनत यांना अनेक अडचणी व आव्हानं आली. लग्नानंतर पहिल्याच वर्षात मजहर फसवणूक करत असल्याचं कळलं, तरीही ते लग्न १२ वर्षे टिकवलं, त्यामागचं कारण झीनत अमान यांनी सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिमी गरेवालला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत झीनत यांनी वैवाहिक जीवन आलेल्या आव्हानांबद्दल खुलासा केला होता. “लग्नानंतर पहिल्याच वर्षी मला समजलं की मी मोठी चूक केली आहे; पण लग्नाचा निर्णय मी सर्वांच्या विरोधात जाऊन घेतल्याने मी ते लग्न टिकवायचं ठरवलं. हे लग्न त्याच्यासाठीही (मजहर खान) चांगलं होतं असं मी म्हणत नाही. पहिल्या वर्षापासूनच हे लग्न खूप कठीण राहिलं. कारण मी तेव्हा गरोदर होते, माझा मोठा मुलगा पोटात होता आणि मजहर तिथे नव्हता. मजहरचं ज्या महिलेबरोबर अफेअर होतं, तिच्याबद्दलचा एक मोठा लेख स्टारडस्ट मॅगझिनमध्ये आला होता आणि तेच वास्तव होतं,” असं झीनत अमान म्हणाल्या होत्या.

हेही वाचा – “तोंड रक्ताने माखलेली एक…”, दिव्या भारतीच्या निधनाबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा; तिला पडताना ‘या’ व्यक्तीने पाहिल्याचा केला दावा

पतीच्या आजारपणाची पाच वर्षे

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर विभक्त व्हायचं होतं, पण नवजात मुलासाठी तसं केलं नाही, असं झीनत यांनी सांगितलं होतं. “माझ्या मुलाचा जन्म होताच मला त्या नात्यातून बाहेर पडायचं होतं, आमची त्यावर चर्चा झाली, पण मला वाटलं की माझ्या मुलासाठी मी एक संधी द्यायला हवी आणि मी निर्णय बदलला. लग्न टिकावं यासाठी मी शक्य ते सगळे प्रयत्न केले. माझा धाकटा मुलगा ५ वर्षांचा असताना मी पुन्हा अभिनय करण्याचा विचार केला, मात्र त्याआधीच मजहर गंभीर आजारी पडला. मी पाच वर्षे त्याच्यासाठी घालवली, तो काळ खूप कठीण होता,” असं त्या म्हणाल्या होत्या.

हेही वाचा – घटस्फोटित अभिनेत्रीने ११ वर्षांनी मोठ्या आध्यात्मिक गुरूशी केलं दुसरं लग्न, फोटो झाले व्हायरल

झीनत अमान, मजहर खान व त्यांची मुलं (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

पुढे त्या म्हणालेल्या, “मी शक्य ते सगळे प्रयत्न केले. त्याला मुंबईतील प्रत्येक रुग्णालयात नेलं, इतरही ठिकाणी केलं. इंजेक्शन कसे द्यायचे, ड्रेसिंग कसे करायचे हे मी शिकले. मी त्याला परदेशात नेलं, तिथे मला चांगले डॉक्टर भेटले. नंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. पण या सगळ्यानंतर मी भावनिकरित्या खूप कमकुवत झाले.”

हेही वाचा – दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…

…अन् शेवटी पतीला सोडण्याचा निर्णय घेतला – झीनत अमान

मजहरच्या प्रकृतीत सुधारणा झाली, मात्र नंतर त्याला प्रिस्क्रिप्शन ड्रग्जचे व्यसन जडले आणि त्याच्या किडनीवर गंभीर परिणाम झाला. त्याच्या या व्यसनामुळे शेवटी झीनत यांनी या लग्नातून बाहेर पडायचं ठरवलं. “तो स्वतःला त्रास देत होता आणि हे पाहून मी तिथे त्याच्याबरोबर राहू शकत नव्हते. तो दिवसाला सात वेदनाशामक गोळ्या घ्यायचा. मी आणि मुलं त्याला विनंती करायचो. शेवटी व्हायचं तेच झालं, त्याच्या किडनीवर परिणाम झाला. त्यानंतर मी त्याला सोडलं, मात्र तरीही मला त्याची काळजी वाटत होती,” असं त्या म्हणाल्या होत्या. त्या अवस्थेत मजहरला सोडण्याबद्दल मनात अपराधीपणाची भावना नसल्याचं नव्हती, कारण मी जे केलं ते ९९ टक्के महिला करू शकल्या नसत्या, असं त्यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zeenat aman husband mazhar khan was cheating on her in 1st year of marriage hrc