बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या इतक्या वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्रींबरोबर काम केलं. कामाबद्दल असलेल्या त्यांच्या समर्पणाची अनेकदा चर्चा होताना दिसते. एका मुलाखतीत अभिनेत्री झीनत अमान यांनी एक किस्सा सांगितला होता. हा किस्सा खइके पान बनारसवाला’ गाण्याच्या शूटिंगचा होता.

“जोपर्यंत त्यांना हे गाणे परिपूर्ण वाटले नाही, तोपर्यंत…”

अभिनेत्री झीनत अमान यांनी २०१७ ला फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ यांच्या कामाप्रति असलेल्या समर्पणाविषयी बोलताना एका चित्रपटाची आठवण सांगितली होती. त्यांनी म्हटले होते, “डॉन चित्रपटातील आम्ही खइके पान बनारसवाला या गाण्याचे शूटिंग करीत होतो. हे गाणे सर्वोत्कृष्ट होण्यासाठी अमिताभ बच्चन खूप उत्सुक होते. जोपर्यंत त्यांना हे गाणे परिपूर्ण वाटले नाही. तोपर्यंत ते सतत आणखी एक शॉट म्हणत राहिले आणि तोपर्यंत शूट करीत राहिले.” ‘डॉन’ हा चित्रपट झीनत अमान आणि अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. चंद्रा बारोट यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची पटकथा सलीम-जावेद या प्रसिद्ध जोडीने लिहिली होती.

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Amitabh Bachchan shouted at R Balki
दिग्दर्शकाच्या करिअरच्या पहिल्याच सिनेमाचा पहिलाच सीन; चिडलेले अमिताभ बच्चन त्याच्यावर सर्वांसमोर ओरडलेले अन्…
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
Amitabh Bachchan share school days memories in kaun Banega crorepati season 16
अमिताभ बच्चन होते बॅकबेंचर, शाळेच्या आठवणी सांगत म्हणाले, “मागे बसून मी आणि माझे मित्र…”
Amitabh Bachchan
अभिषेक बच्चनचे निम्रत कौरशी अफेअर असल्याच्या चर्चा; अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्रीला लिहिलेले पत्र झाले व्हायरल
Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
“मी अभिषेक बच्चनशी…”, ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य

त्याबरोबरच झीनत अमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या दडपणाखाली काम करण्याच्या पद्धतीचे कौतुकदेखील केले होते. त्यांनी म्हटलेले, “आयुष्यातील कोणत्याही परिस्थितीला धाडस आणि सन्मानाने सामोरे जाण्याची प्रेरणा अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. कोणतीही प्रसिद्ध व्यक्ती सतत चर्चेत असते. मग त्याचा राजकीय कल असो किंवा त्याच्या काही सहकलाकाराबरोबर असलेले नाते असो; ज्यामध्ये त्यांच्यावर आरोपही झाले. मात्र, अमिताभ बच्चन यांनी कायम प्रत्येक गोष्टीचा सन्मानाने सामना केला. त्यांना जो आदर मिळतो आणि प्रशंसा केली जाते, ती त्यांनी मिळवली आहे.”

अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांत एकत्र काम केले आहे. रोटी कपडा और मकान (१९७४), डॉन (१९७८), द ग्रेट गॅम्बलर, (१९७९), दोस्ताना(१९८०), लावारिस (१९८१), पुकार (१९८३), महान (१९८३) अशा अनेक चित्रपटांत त्यांनी एकत्र काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

हेही वाचा: Bigg Bossच्या पहिल्याच एपिसोडला ऐतिहासिक TRP! अभिनेत्याची मोठी घोषणा; म्हणाला, “होस्ट म्हणून शेवटचा सीझन…”

अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांची चित्रपटसृष्टीमध्ये येण्याआधीपासून मैत्री होती. त्यांचा मित्रपरिवारदेखील एकच असल्याने ते खूप वेळ बरोबर घालवायचे. मित्रांच्या घरी सगळे एकत्र भेटत, गप्पा मारण्याचा आनंद ते घेत असत. त्या काळात अमिताभ बच्चन यांना संगीतात रुची असल्याचे वाटत होते. त्यांना विनोदाचीही उत्तम जाण होती, असे झीनत अमान यांनी सांगितले होते. अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन त्यांना ‘दा’, असे म्हणायचे. त्यामुळे झीनत अमानदेखील त्यांच्या इतर मित्रांसह बिग बींना ‘दा’ असे संबोधत असल्याची आठवण त्यांनी सांगितली होती. महत्त्वाचे म्हणजे दोघांनीही एका वर्षाच्या अंतराने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अमिताभ बच्चन यांनी १९६९ मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटातून पदार्पण केले; तर झीनत अमान यांनी १९७० मध्ये ‘द इव्हिल विदिन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.