राज कपूर आणि झीनत अमान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. झीनत अमान यांनी साकारलेल्या रुपा या पात्राची मोठी चर्चा झाली होती. आता दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांनी सोशल मीडयावर त्या भूमिकेसाठी त्यांना कास्ट करावं म्हणून त्यांनी कसे कपडे घातले होते, हे शेअर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झीनत अमान यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ शूटिंगदरम्यानच्या सेटवरील एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये राज कपूर झीनत अमान यांना मेकअप करण्यात मदत करत असल्याचे दिसत आहे. या पोस्टमध्ये रुपाच्या भूमिकेमध्ये त्या कशा कास्ट झाल्या, याबद्दल सांगितले आहे.

काय म्हणाल्या झीनत अमान?

१९७६ साली मी राज कपूर आणि शशी कपूर यांच्याबरोबर ‘वकील बाबू’ या चित्रपटात काम करत होते. त्या दिवसांत राज कपूर ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाच्या कल्पनेबद्दल चर्चा करत असत. त्यांच्या कलेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा मूलगामी होता. ते जे चित्रपट बनवणार होते, त्यासाठी ते खूप उत्साही होते. त्या दिवसांत त्यांनी आम्हाला या चित्रपटाच्या कथेबद्दल असे सांगितले होते की, एक पुरुष एका स्त्रीच्या आवाजाच्या प्रेमात पडतो, पण तिच्या दिसण्याशी त्याला जुळवून घेता येत नाही. इतके ते चित्रपटाबद्दल उत्सुक होते, मात्र त्यांना मला रुपाच्या भूमिकेत कास्ट करायचे नव्हते. मी त्यावेळी मोठी स्टार होते, मात्र त्यांनी मला कास्ट करण्यात रस दाखवला नाही, त्याचा मला त्रास होऊ लागला. माझी मॉर्डन प्रतिमा, मिनी स्कर्ट आणि बूट यामुळे मी त्यांना रुपाच्या पात्रात दिसत नव्हते.”

“त्यानंतर मी एका संध्याकाळी लवकर शूट संपवले आणि माझ्या ड्रेसिंग रुममध्ये जास्तीचे ३० मिनिट घालवले. मला जशी रुपा वाटत होती, तशी मी तयार झाले. मी घागरा चोळी घातली आणि रिबीनीने माझ्या केसांच्या वेण्या घातल्या. त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर डिंकाने टिश्यू पेपर चिटकवून डाग लावला.”

झीनत अमान इन्स्टाग्राम

“मला माहीत होते की, राजजी त्यांचा बहुतेक वेळ हा द कॉटेज या ठिकाणी घालवत असत. तिथे ते त्यांच्या मीटिंग, छोटे कार्यक्रम आयोजित करत असत. जेव्हा मी तयार होऊन कॉटेजवर पोहचले, तेव्हा राजजींचा उजवा हात असलेल्या म्हणजेच त्यांच्या जवळचा व्यक्ती जॉनने माझे स्वागत केले. तो प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघत होता. त्याला मी सांगितले, साहेबांना सांगा की रुपा आली आहे”, पुढे काय झाले याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करत उद्या याबद्दल अधिक सांगेन असे म्हटले आहे.

हेही वाचा: सलमान खानचा ३० वर्षे बॉडीगार्ड असलेल्या ‘शेरा’ची गोष्ट! त्याचं खरं नाव, वय माहितीये का? जाणून घ्या…

‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zeenat aman reveals what she did for cast in satyam shivam sundaram as raj kapoor had no intention of casting her in the role nsp