दिग्दर्शक अनुराग कश्यपला खरी ओळख मिळवून दिली ती ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाने. हे खुद्द अनुरागनेदेखील बऱ्याच मुलाखतीत कबूल केलं आहे. या चित्रपटामुळे नवे कलाकार, अभिनेते, लेखक यांची एक फळीच तयार झाली. पण तो चित्रपट एवढा सुपरहीट होऊनसुद्धा ‘गॅंग्स ओफ वासेपूर’मुळे कोणालाच आर्थिक फायदा झाला नसल्याचंही अनुरागने मध्यंतरी वक्तव्य केलं होतं. आता याच चित्रपटाचा लेखक झीशान कादरी याने ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या तिसऱ्या भागाबद्दल वक्तव्य केलं आहे.

‘गँग्स ऑफ वासेपूर’ची कथा आणि पटकथा लिहिण्यात अनुरागसह झीशानचंही प्रचंड योगदान आहे. या चित्रपटात झीशानने छोटी पण महत्त्वाची भूमिकादेखील केली आहे, पण अभिनयाबरोबरच त्याच्या लिखणाचीची खूप प्रशंसा झाली. आता झीशानने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान ‘गँग्स ऑफ वासेपूर ३’बद्दल वक्तव्य केलं आहे. अनुराग कश्यप आणि झीशान आणि इतर काही लोकांनी या तिसऱ्या भागावर काम सुरू केलं होतं पण काही कारणास्तव ते काम रखडल्याचंही झीशानने स्पष्ट केलं.

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’

आणखी वाचा : सीमा हैदरला चित्रपटात काम देण्यावरुन मनसे आक्रमक; अमेय खोपकर म्हणाले, “हे असले तमाशे…”

आऊटलूकशी संवाद साधतांना झीशान म्हणाला, “आम्ही लॉकडाउनदरम्यान ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या तिसऱ्या भागाबद्दल चर्चा केली. जेव्हा काहीच घडत नव्हतं त्यामुळे अनुराग चांगलाच अस्वस्थ झाला. अद्याप तरी तो विषय बाजूलाच पडला आहे. यावार अनुरागच काहीतरी निर्णय घेईल. कदाचित तो याचं दिग्दर्शन करेल किंवा मी करेन, किंवा अनुराग फक्त निर्माता म्हणूनच यात सहभागी होईल. त्यामुळे याबद्दल मीतरी काहीच ठोस माहिती देऊ शकत नाही.”

‘गँग्स ऑफ वासेपूर’ला अभूतपूर्व यश मिळालं पण अनुराग कश्यपला मात्र याचा चांगलाच फटका बसला. जेव्हा या चित्रपटाला ७ वर्षं पूर्ण झाली तेव्हासुद्धा २०१९ मध्ये अनुरागने असंच एक विचित्र ट्विट केलं होतं. या ट्विट मध्ये तो म्हणतो, “७ वर्षांपूर्वी याच दिवशी माझ्या आयुष्यात साडे साती सुरू झाली. तेव्हापासून सगळ्यांना माझ्याकडून सतत अशाच प्रकारचं काम अपेक्षित आहे. लोकांच्या या अपेक्षांपासून अलिप्त राहायचा मी प्रयत्न करतोय. आशा करतो ही साडे साती या वर्षाअखेरीपर्यंत संपेल.”