ज्येष्ठ गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि त्यांची मुलगी चित्रपट निर्माती झोया अख्तर (Zoya Akhtar) यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या एक्सप्रेसो कार्यक्रमाला हजेरी लावली. यात त्यांनी साहित्य व सिनेमावर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. या मुलाखतीत झोयाने शारीरिक इंटिमसी दाखवण्यासाठी कोणतीही सेन्सॉरशिप नसावी, असं मत मांडलं.
झोयाने दिग्दर्शित केलेला ‘द आर्चीज’ व तिची निर्मिती असलेला ‘खो गए हम कहां’ हे दोन्ही चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले होते. तिने ओटीटीवर सेन्सॉरशीप नसण्याबाबत प्रतिक्रिया दिली. “स्क्रीनवर सहमती असलेली इंटिमसी दाखवणे खूप महत्वाचे आहे. मी अशा काळात लहानाचे मोठे झाले जिथे स्क्रीनवर महिलांची छेड काढणे, त्यांना मारणे, त्यांचा छळ करणे आणि लैंगिक अत्याचार करणे या सर्व गोष्टी दाखवलेल्या चालतात, पण तुम्ही स्क्रीनवर किस पाहू शकत नाही? लोकांना दोन सज्ञानांमधील प्रेम आणि इंटिमसी पाहण्याची परवानगी दिली पाहिजे,” असं झोया म्हणाली.
Arbaz Patel Girlfriend: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ती कोण आहे, काय करते? जाणून घ्या
ओटीटीवर सेन्सॉरशिप नसल्याने इंटिमसी दाखवण्याबाबत कोणतीही मर्यादा पाळली जाणार नाही, असाही चित्रपट निर्मात्यांचा दृष्टीकोन तयार होऊ शकतो, यावर झोया अख्तर म्हणाली की या सर्व गोष्टी निर्मात्याच्या कलात्मक निवडीवर अवलंबून असतात. “प्रत्येक चित्रपटाची एक शैली असते आणि प्रत्येक चित्रपट निर्माता एका विशिष्ट पद्धतीने गोष्ट सांगतो. रमेश सिप्पींच्या शोलेला विरोध करताना त्यात हिंसा दाखवणं काळाच्या पुढे होतं असं म्हटलं जातं, पण त्याच वेळी टँरंटिनोच्या चित्रपटातील हिंसा मात्र ऑपरेटिक वाटते. तुम्ही प्रेक्षकांमध्ये काय जागृत करण्याचा प्रयत्न करत आहात याबद्दल हे सर्व अवलंबून आहे,” असं झोया म्हणाली.
“अमेरिकन लोकांच्या तुलनेत फ्रेंच लोक पुरुषांच्या नग्नतेबाबत जास्त मोकळ्या विचारांचे आहेत. त्यांचं त्यांच्या शरीराशी असलेलं नातं वेगळं आहे. ही एक सांस्कृतिक गोष्ट आहे आणि तुम्ही स्वतःबरोबर किती कम्फर्टेबल आहात, तुम्ही सेक्सकडे कसे पाहता, तुम्ही तुमच्या शरीराकडे कसे पाहता, अशा गोष्टींवर ते अवलंबून असते. मी ‘लस्ट स्टोरीज’मध्ये जे केलं ते ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये करणार नाही. खरं तर प्रेक्षकांना याचा फारसा फरक पडत नाही कारण हेतू स्पष्ट होता,” असं झोया म्हणाली.
२० सिनेमे फ्लॉप, १३ वर्षे चित्रपटांपासून दूर; बॉलीवूड अभिनेता तरीही कमावतो बक्कळ पैसे, करतो ‘हे’ काम
झोयाच्या मुद्द्यांवर काय म्हणाले जावेद अख्तर?
झोयाच्या मुद्यांना जोडून जावेद अख्तर म्हणाले, “तुम्ही जाणीवपूर्वक समोरच्या व्यक्तीला उत्तेजीत करण्यासाठी रोमँटिक सीन दाखवत असाल तर ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्हाला जर खरा रोमान्स, भावना दाखवायच्या असतील तर ती वेगळी गोष्ट आहे.” ते खऱ्या आयुष्यात जे शब्द वापरतात आणि स्क्रीनवर जे ऐकतात त्याची तुलना करत ते म्हणाले, “मी कितीही रागात असेल तरी मी चार अक्षरांची ती शिवी देत नाही. पण जेव्हा मी बॅन्डिट क्वीनमध्ये ती शिवी ऐकली तेव्हा मला त्यावर आक्षेप नव्हता. कारण त्याचा त्याचा हेतू तुम्हाला धक्का बसावा असा नव्हताच. बरेच चित्रपट म्हणतात की ते समाजातील काही गोष्टींचे खरे चित्रण करतात, त्यामुळे असे शब्द वापरतात. पण भाषा वगळता त्या चित्रपटांमध्ये समाजातील कोणत्याही गोष्टींचे वास्तव चित्रण नसते,” असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.