अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवी यांची दुसरी लेक खुशी कपूर ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले असून याचा टीझर नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे.

हेही वाचा : “अजयशी लग्न करणं…” अभिनेत्री काजोलचा लग्नाबाबत मोठा खुलासा, म्हणाली “‘तो’ निर्णय होता सर्वात कठीण”

‘द आर्चीज’चा टीझर रिलीज केल्यानंतर ‘हा चित्रपट नेपोटीजम आहे’ असे म्हणत काही सोशल मीडिया युजर्सनी चित्रपटाला ट्रोल केले. त्यामुळे या चित्रपटाची निर्माती- दिग्दर्शक झोया अख्तरने या स्टारकिड्सला खास गुरुमंत्र दिला आहे.

हेही वाचा : “‘गदर २’ फ्लॉप होणार” प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत; म्हणाला, “कपिल शर्मा चित्रपटांसाठी पनौती…”

झोयाने ‘फिल्म कम्पॅनियन’शी संवाद साधताना सांगितले की, “मी आधीच चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्या स्टारकिड्सला सांगून ठेवले आहे. रेडी व्हा आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या. जगात तुम्हाला नेपोटीजमबाबत वेगवेगळ्या गोष्टी ऐकवल्या जातील पण, तुम्ही सर्वांना तुमचे काम दाखवून उत्तर द्या. कोणतेही मूल त्याच्या पालकांप्रमाणे करिअर निवडू शकते यात गैर काय आहे? कोणी काय केले पाहिजे हे इतर कोणीही ठरवू नये.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’मध्ये रावणाची भूमिका सैफ अली खानला नव्हे तर ‘या’ बॉलीवूड सुपरस्टारला केली होती ऑफर; अभिनेत्याने भूमिका नाकारली कारण…

झोया पुढे म्हणाली, “आपण प्रेक्षकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही परंतु, आपण आपल्या कामावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळे सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तुम्ही फक्त काम करा असे मी त्यांना आधीच सांगितले आहे.” दरम्यान, ‘द आर्चीज’मध्ये सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर, डॉट, वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा असे नवोदित कलाकार दिसणार आहेत. नेटफ्लिक्सने चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे परंतु, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

Story img Loader