बॉलीवूडला २०१४ साली आता एक नवी हॉट जोडी मिळणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केल्यानंतर ‘आशिकी २’ अभिनेत्री श्रद्धा कपूर वरूण धवनसोबत झळकणार आहे.
वरूण आणि श्रद्धाने रेमो डीसोजाचच्या ‘अॅनी बडी कॅन डान्स २’ चित्रपटाकडे पावले वळवली आहेत. यात प्रभू देवादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूण धवन या चित्रपटासाठी प्रशिक्षण घेत असून, त्याने अनेकवेळा स्वतःला जखमी करून घेतले आहे. ‘एबीसीडी २’चे चित्रीकरण लास वेगास येथे होणार आहे. तसेच, यात १० गाणी असल्याचेही सांगण्यात येत आहे.