बॉलीवूड अभिनेते बोमन इराणी यांना कुविख्यात गुंड रवी पुजारीकडून धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
बोमन इराणी यांना पुजारीकडून धमकीचा फोन आला आणि त्यामुळे आम्ही इराणी यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी सांगितले आहे.
शाहरुख खानला अंडरवर्ल्डकडून धमकी!
येत्या ऑक्टोबरमध्ये बोमन इराणी, शाहरूख खान, अभिषेक बच्चन आणि दीपिका पदुकोण यांचा ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. महत्त्वाचीबाब म्हणजे याआधी बॉलीवूड बादशहा शाहरूख खानच्या ‘रेड चिलीज’च्या कार्यालयात फोन करून धमकी देण्यात आली होती. शाहरुख आणि बोमन ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटातील भाग आहेत. त्यामुळे पोलीस या अनुषंगाने तपास करत आहेत. यापूर्वीही पुजारी गँगकडून बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांना धमकी देण्यात आली आहे. २३ ऑगस्ट रोजी चित्रपट निर्माते अली मोरानी यांच्या जुहू येथील राहत्या घरावर तीन अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी शाहरुखच्या ‘रेड चिलीज’ कार्यालयात पुजारी गँगकडून धमकीचा फोन आला आणि यामध्ये शाहरुखला मोरानी यांच्यापासून दूर राहण्याचे बजावण्यात आल्याचे समजते.
भारत सरकारने शाहरूख खानला सुरक्षा पुरवावी – पाक गृहमंत्री रहमान मलिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boman irani gets police protection after threat from underworld don ravi pujari