फिजी येथे ‘संता बंता’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान बोमन इराणी यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने आता चित्रीकरण पाच दिवसांसाठी थांबविण्यात येणार आहे.
चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर एखाद्या कलाकाराला दुखापत होण्याची घटना बॉलिवूडमध्ये नवीन नाही.आता हा दुखापतीचा प्रकार अष्टपैलू अभिनेता बोमन इराणी यांच्याबाबतीत घडला आहे.
‘संता बंता’ या चित्रपटात संताची भूमिका करणाऱ्या बोमन इराणी यांच्यावर एका गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. त्या वेळी त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यांना तातडीने त्यांची व्यवस्था असलेल्या हॉटेलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू
आहेत.
दरम्यान, ही दुखापत फार गंभीर नसल्याने सेटवर सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Story img Loader