बॉलिवूडमध्ये आजवर असे अनेक कलाकार झाले आहेत ज्यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेता बोमन इराणी. हरहुन्नरीने अभिनय करणारे बोमन इराणी आज प्रत्येकाचे आवडते कलाकार असल्याचे पाहायला मिळते. आजही ते त्याच जोमाने अभिनय करुन प्रेक्षकांना प्रेमात पाडत असतात. बोमन यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे बोमन यांच्यावर चाहत्यांचे प्रेम आणखी वाढले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोमन यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बोमन एका रिक्षामध्ये बसले आहेत. बोमन आपल्या गाडीमधून प्रवास करत असताना बाजूने एक महिला रिक्षाचालक जात असते. बोमन त्या महिलेला शुभेच्छा देत असतात. रिक्षाचालक महिला बोमन यांना तिच्या सोबत फोटो काढण्यासाठी विनंती करते. बोमन आपल्या चाहत्यांनी कधीच नाराज करत नाहीत. ते आपल्या वाहनामधून उतरुन त्या महिलेसोबत फोटो काढतात.

त्यानंतर रिक्षाचालक महिलेचे नाव लक्ष्मी असल्याचे बोमन सांगतात. तसेच दिवसा मराठी मालिकांमध्ये काम करते आणि रात्री रिक्षाचालकाचे काम करते असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. ही महिला सर्वांसाठीच एक प्रेरणा ठरु शकते असे ते पुढे म्हणतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boman irani shares a video of an actress in marathi serials who is also a rickshaw driver